धुळे/दोंडाईचा । dhule । प्रतिनिधी
दोंडाईचा (Dondaich) शहरातील नवाभोई वाडा येथे चोरट्यांनी धाडसी घरफोडी (house burglary) करीत पाच लाखांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुसुमबाई साहेबराव रामोळे (वय 47 रा. नवाभोईवाडा, पाण्याच्या टाकीजवळ, दोंडाईचा) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्या दि. 27 सहकुटुंब वणी (जि. नाशिक) येथे भाचीच्या लग्नाला गेल्या होत्या. त्यामुळे त्याचे घर बंद होते. ही संधी साधत चोरट्यांनी रात्रीतून घराचा कडी-कोंडा तोडून आतप्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील तिजोरी उघडून त्यातील एकुण 3 लाख 18 हजारांचे 53 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 1 लाख 85 हजारांचे 3 किलो 70 भार वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण 5 लाख 3 हजारांचा ऐवज चोरून नेले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश मोरे करीत आहेत.