Sunday, November 17, 2024
HomeUncategorized५०२ कोटींची मालमत्ता जप्त; निवडणूक यंत्रणेची कारवाई

५०२ कोटींची मालमत्ता जप्त; निवडणूक यंत्रणेची कारवाई

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल अ‍ॅपवर एकूण ५ हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ५ हजार २३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे अ‍ॅप कोणत्याही अ‍ॅ‍ॅप स्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

ठाण्यात २१ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यात अंजूरगाव आणि आलीमघर खाडीमध्ये हातभट्टी केंद्रावर ११ नोव्हेंबर रोजी सामूहिक धाडसत्र मोहिम राबवून एकूण सात गुन्हे नोंदविले आहे. या कारवाईत २०० लीटर क्षमतेच्या ३५४ ड्रम्स, एक हजार लीटर क्षमतेचे तीन बॉयलर आणि अन्य हातभट्टी साहित्याचा मुद्देमाल जप्त केला. सदर माल हा नाशवंत असल्यामुळे जागेवरच नष्ट करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत २० लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या