Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयात बाजार समितीसाठी 502 उमेदवारी अर्ज दाखल

नंदुरबार जिल्हयात बाजार समितीसाठी 502 उमेदवारी अर्ज दाखल

नंदुरबार nandurbar। प्रतिनिधी-

जिल्हयातील सहाही कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणुकीसाठी (election) उमेदवारी अर्ज (Application for candidacy) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात नंदुरबार येथे 93, शहादा येथे 182, नवापूर येथे 66, तळोदा येथे 86, धडगाव येथे 37, अक्कलकुवा येथे 38 असे 502 एकुण उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अक्कलकुवा बाजार समितीत आ.आमशा पाडवी यांच्यासह पाच जण बिनविरोध झाले आहेत.

- Advertisement -

जिल्हयातील नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. काही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. आज शेवटच्या दिवशी नंदुरबार येथे एकुण 93, शहादा येथे 182, नवापूर येथे 66, तळोदा येथे 86, धडगाव येथे 37, अक्कलकुवा येथे 38 असे एकुण 502 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

नंदुरबारात 93 अर्ज

नंदुरबार येथील कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 93 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

शहादा येथे 182 उमेदवारी अर्ज

शहादा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुुरु आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 182 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 20 रोजी होणार्‍या उमेदवारी माघारीनंतर निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

तळोदा

तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेवटच्या दिवशी एकूण 86 अर्ज दाखल झाले.

यात सोसायटी मतदार संघातून 49, ग्रामपंचायत मतदार संघातून 20, व्यापारी मतदारसंघातून 11 व हमाल मापाडी मतदारसंघातून 6 अशा एकूण 18 जागांसाठी एकूण 86 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. आज आ.राजेश पाडवी यांनी अनुसूचित जमाती सोसायटी मतदारसंघातून आपला नामांकन अर्ज दाखल केला. याप्रसंगी इच्छुकांसमवेत नामांकन अर्ज दाखल करतांना त्यांचे सूचक, अनुमोदक तसेच त्या त्या पक्ष्याचे नेते मोठ्या संख्येने हजर होते. या अर्जांची छाननी दि.5 एप्रिल रोजी असून, दि.20 एप्रिल या दिवशी माघारीसाठी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी बाजार समितीची आर्थिक बाजू पाहता निवडणूक बिनविरोध होईल किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. असे असले तरी आज मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सचिन खैरनार तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगलसिंग पावरा काम पाहत आहेत.

नवापुरात काँग्रेस व परिवर्तन पॅनलमध्ये लढत

नवापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 66 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष व परिवर्तन पॅनल यांची आमनेसामने सरळ लढत असून हे दोघे पक्ष पूर्ण सतरा जागा लढविणार आहेत.

सोसायटी मतदार संघातून 44, ग्रामपंचायत मतदार संघातून 17, व्यापारी मतदार संघातून 5 अशा एकूण 17 जागांसाठी एकूण 66 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे. या संपुर्ण निवडणुकीचे कामकाज सहायक निबंधक शितल महाले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश खैरनार, उमेश ठाकरे काम पहात आहेत.

अक्कलकुवा येथे पाच जण बिनविरोध

अक्कलकुवा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, यातील पाच संचालक बिनविरोध झाले आहेत.

अक्कलकुवा बाजार समितीत एकुण 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत. परंतू हमाल मापाडी मतदार संघात नोंदणी न झाल्याने 17 जागांसाठी निवडणुक प्रक्रिया सुरु आहेत. यासाठी आजअखेर एकुण 38 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात आ.आमशा पाडवी, सौ.पाडवी, ललीता विनोद पाडवी, पवन सुरेशचंद्र जैन, स्वप्नील प्रेमचंद जैन यांचा समावेश आहे.

धडगाव येथे 37 उमेदवारी अर्ज

धडगाव येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 37 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या