नाशिक | प्रतिनिधी Nasik
डेरवन, रत्नागिरी येथे दि. ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ५१ व्या कॅडेट आणि सब ज्युनियर गटाच्या राज्यअजिंक्यपद ज्युदो स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे. यासाठी सोमवार दिनांक १६ सप्टेंबर, २०२४ रोजी यशवंत व्यायाम शाळेच्या ज्युदो हॉलमध्ये जिल्हा ज्युदो स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये कॅडेट गटासाठी वयोगट १५ वर्षे पूर्ण आणि १८ वर्षे आतील असावा. यासाठी खेळाडूची जन्मतारीख सन २००७ ते २००९ या दरम्यान असावी. या कॅडेट गटासाठी मुलांसाठी वजन गट ५० किलो, ५५किलो, ६० किलो, ६६ किलो, ७३ किलो, ८१किलो, ९० किलो आणि ९० किलोवरील गट असे आठ वजन गट असणार आहेत.
तर कॅडेट मुलींसाठी ४०किलो, ४४किलो, ४८किलो, ५२किलो, ५७किलो, ६३ किलो, ७०किलो आणि ७० किलोवरील गट असे सात गट असणार आहेत. तर सब ज्युनियर गटासाठी १५ वर्षे पूर्ण आणि २१ वर्षाखालील वय असावे. जन्म साल २००४ ते २००९ या दरम्यान असावे. या गटासाठी मुलांसाठी ५५ किलो, ६०किलो, ६६किलो, ७३किलो, ८१किलो, ९०किलो, १००किलो आणि १०० किलोवरील गट असे आठ गट, तर मुलींसाठी ४४ किलो, ४८किलो, ५२ किलो, ५७किलो, ६३ किलो, ७० किलो, ७८ किलो, आणि ७८ किलोवरील गट असे आठ गट असणार आहेत. सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी स्पर्धास्थळी आपले आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला, त्याची सत्य (झेरॉक्स) प्रत आणि २ पासपोर्ट साइजचे फोटो यासह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची जिल्हा संघामध्ये निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू डेरवन, रत्नागिरी येथे आयोजित ५१ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. तरी नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहाभागी व्हावे असे आवाहन नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी प्रशिक्षक योगेश शिंदे मो. क्र.९४०३२७५८३६,अथवा सुहास मैंद मो. क्र. ८८८८३५८९६९ यांच्याशी संपर्क करावा.