Thursday, March 27, 2025
Homeदेश विदेशLoksabha Election 2024 : सहाव्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.०७ टक्के मतदान

Loksabha Election 2024 : सहाव्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.०७ टक्के मतदान

'या' राज्यात विक्रमी मतदानाची नोंद

नवी दिल्ली | New Delhi

देशातील सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या ५८ जागांसाठी आज सहाव्या टप्प्यातील (Sixth Phase) मतदान (Voting) पार पडले. या ५८ लोकसभा मतदारसंघांमध्ये ११.१३ कोटी मतदार असून यात ५.८४ कोटी पुरुष व ५.२९ कोटी महिला मतदारांचा समोवश आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली असून नुकतीच निवडणूक आयोगाकडून सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

या आकडेवारीनुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात ५७.०७ टक्के इतके मतदान झाले आहे. यात सर्वाधिक विक्रमी मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी मतदानाची नोंद उत्तरप्रदेशमध्ये झाली आहे. तसेच राज्यनिहाय मतदानाच्या आकडेवारीचा विचार केल्यास बिहार ५२.२४ टक्के, हरियाणा ५५.९३ टक्के, जम्मू आणि काश्मीर ५१. ३५ टक्के, झारखंड ६१.४१ टक्के, नवी दिल्ली ५३.७३ टक्के, ओडिसा ५९.७३ टक्के, उत्तरप्रदेश ५२. ०२ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ७७.९९ टक्के इतके मतदान झाले आहे.

दरम्यान, देशातील सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या जागांचा दुपारपर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीचा विचार केल्यास दुपारी एक वाजेपर्यंत ३९.१३ टक्के आणि तीन वाजेपर्यंत ४९.०२ टक्के इतके मतदान झाले होते. तर सकाळी नऊ वाजेपर्यंत १०.८२ टक्के इतके मतदान झाले होते. तर हीच आकडेवारी पुढे वाढून सकाळी ११ वाजेपर्यंत २५.७६ टक्क्यांवर पोहचली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhushansingh Raje Holkar : “… तर आम्ही सहन करणार नाही”; वाघ्या...

0
पुणे | Pune वाघ्या कुत्र्याच्या रायगड किल्ल्यावरील स्मारकावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) पत्र (Letter)...