Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबारामती पोटनिवडणुकीत ५७.४८ टक्के मतदान

बारामती पोटनिवडणुकीत ५७.४८ टक्के मतदान

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बारामतीत ५७.४८ टक्के तर राहुरीत ५५.३१ टक्के मतदान झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे बारामती,राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत तुलनेने कमी मतदान होते. मात्र, या पोटनिवडणुकीत निम्म्याहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर राहुरीत भाजपच्या अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यासह ७ उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकीची मतमोजणी ४ मे २०२६ रोजी हाती घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त करावी : हेमंतदास महाराज

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत गोदावरी नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी...