धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात एकाच दिवशी 58 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात बाधितांची संख्या तीन हजार 51 झाली आहे.
जिल्हा रुग्णालय येथे आज केलेल्या अँटीजन टेस्टच्या 10 अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. त्यात सोनगीर 3, फागणे 1, नकाणे 3, धुळे 2, निकुंभे 1 या रुग्णांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात धुळे 5, भोई गल्ली 1, लिलाबाई चाळ 1, वल्लभ नगर दसेरा मैदान 1, गणेश कॉलनी 1, सोनगीर 1, अंबाजी नगर 1, शिंदखेडा 1, राम नगर 1, म्हसदी साक्री 1, सेवा हॉस्पिटल साक्री रोड 1, यशवंत नगर 1 या रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी लॅबमधील 32 अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. त्यात साने गुरुजी सोसायटी 8, सुपडू अप्पा कॉलनी 1, गल्ली नंबर 4 मध्ये 2, विद्यानगर 1, ऐंशीफुटी रोड 1, मोहाडी 1, समर्थ नगर साक्री रोड 1, अलाहाबाद बँक जवळ 1, स्वामी नारायण सोसायटी 2, देवपूर 1, बडगुजर प्लॉट 1, बांबू गल्ली 1, गुरुनानक सोसायटी 1, रामदास नगर धुळे 1, वानखेडे नगर 1, पवन नगर 1, सद्गुरू कॉलनी 2, सोनार गल्ली शिरपूर 1, शिंदखेडा 2, धुळे 2 या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांच्या संख्याचा आकडा तीन हजार पार केला असून तो आता तीन हजार 51 एवढा झाला आहे.