मुंबई | Mumbai
आज देशभरातील आठ राज्यांमधील ४९ लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात महराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून राज्यातील विविध मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. यावेळी मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून मतदान केंद्रांबाहेर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाल्यानंतर राज्यातील विविध मतदारसंघात ९ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार भिवंडी – ४.८६ टक्के, धुळे – ६.९२ टक्के दिंडोरी ६.४० टक्के, कल्याण – ५.३९ टक्के, उत्तर मुंबई – ६.१९ टक्के, मुंबई उत्तर मध्य – ६.०१ टक्के, मुंबई उत्तर पूर्व – ६.८३ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – ६.८७ टक्के, दक्षिण मुंबई – ५.३४ टक्के, मुंबई दक्षिण मध्य – ७.७९ टक्के, नाशिक – ६.४५ टक्के, पालघर – ७.९५ टक्के आणि ठाण्यात ५.६७ टक्के मतदान झाले आहे. तर राज्यात नऊ वाजेपर्यंत एकूण ६.३३ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त मतदान सकाळी ९ वाजेपर्यंत पालघरमध्ये तर सर्वात कमी मतदान भिवंडीत झाले आहे.