Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशकात पंधरा मिनिटात ६ मिमी पाऊस

नाशकात पंधरा मिनिटात ६ मिमी पाऊस

नाशिक । प्रतिनिधी

दुपारनंतर शहर व उपनगरीय परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळही पाऊस झाला. दिवसभर पावसाचे वातावरण होते.

- Advertisement -

पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीत ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने अगोदरच १७ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्राला देखील जोरदार पावसाचा तडाखा बसू शकतो असा ‌अंदाज वर्तविण्यात आला आहे. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. मध्येच कडक उन पडायचे.

दुपारपर्यंत उन सावलिचा खेळ सुरु होता. मध्येच पावसाचे शितोडे पडत होते. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी तिन वाजेच्या सुमारास शहर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. दहा ते पंधरा मिनिटे मुसळधार पाउस झाला.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड यासर्व ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाउस उघडल्यानंतर पुन्हा वातावरणात उकाडा जाणवत होता. पुढील दोन दिवस असेच वातावरण अनुभवयाला मिळेल असा भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या