बोराडी Boradi । वार्ताहर
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे आदिवासीच्या संस्कृतीचे दर्शन घडवून देणारा भोंगर्या बाजार (Bhongrya market) शांततेत पार पडला. या भोंगर्या बाजारात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी देखील ढोल वाजून त्या बाजाराचा आनंद लुटला. भोंगर्या बाजारात सुमारे 50 ते 60 लाखांची उलाढाल (turnover) झाली.
लेवा गुजर समाजाची विवाहासाठीची ही आचारसंहिता वाचली का ?
होळी हा सण आदिवासींचा महत्वाचा सण असून आदिवासी पारंपारिक होळी सणासाठी तीरकामठा, बुधे, भोपळे घुंगरू, डफ, मोठे ढोल, बाडे, झांज, बासरी आदि साहित्याची जमवा-जमव करतांना दिसून येत असून मोठ्या उत्साहात बोराडी गावांची होळी सण साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या वर्षी कापूस, कांद्याला योग्य भाव मिळत नसला तरी भोंगर्या बाजार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भोंगर्या बाजाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपला देव देवतांची पूजा करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कोडीद व उर्मदा गावाचा ढोल वाजण्याचा मान संयुक्तरीत्या असल्याने त्या गावातील प्रमुखांनी रितीरिवाजाप्रमाणे देवांची पूजा करून भोंगर्या बाजाराला सुरुवात केली.
मोहिदा शिवारात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेहएक विवाह असाही…
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, बोराडी ग्राम परिषदेचे उपसरपंच राहुल रंधे, रमन पावरा, संस्थेचे सचिव निशांत रंधे, सरपंच सुकदेव भील, कोंडीदचे पोलीस पाटील भरत पावरा, उर्मदाचे भाईदास पावरा,बोराडीचे पोलीस पाटील अनिल पावरा, विनोद पावरा, जितेंद्र पावरा,फुलसिंग पावरा,डेबा पावरा, शिवाजी वसावे, साहेबराव वसावे,रवि वसावे, जगन टेलर, रमेश वसावे, बोराडी ग्रामपंचायत सदस्य हरिसिंग पावरा, डोंगर सिंग पावरा, चंद्रसिंग पवार, अनिल पावरा, बोराडी गाव पाटील पाडवी पावरा, शामकांत पाटील,राज निकम, शशांक रंधे, भरत पावरा, वसंत पावरा,मजित पवार,दाजमल पावरा, जगदीश पावरा,चेत्राम पावरा, दिलीप पावरा, गोकुळ पावरा, डॉ.शाम पावरा,भरत पावरा, पोलीस हवालदार भुषण चौधरी,फुलपाखरे, सुरेश ठाकूर, गौतम सत्तेसा आदी उपस्थित होते.
बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..
Makeup Part 6 : न्यू जनरेशन कॉस्मेटिक्स
या उत्सवासाठी मध्यप्रदेशातील व परिसरातील 60 ते 70 गावातील आदिवासी लोक उपस्थित होते. यामुळे सांगवी रस्ता ते पानसेमल रस्ता व शिरपूर रस्त्यावर एक किमी पर्यंत व्यावसायाची दुकाने थाटण्यात आले होते.तसेच त्या-त्या गावातील प्रमुख आपल्या बरोबर ढोल वाजंत्री( काश्याचे भांडे ) सह बोराडी येथे वाजत गाजत नृत्य करीत संपूर्ण बाजाराला महत्व प्राप्त झाले. भोंगर्या बाजारात लहान थोरांपासून एकचगर्दी केली होती. गुलाल्या बाजार भोंगर्या बाजार हा स्वतंत्र पणे चालणार्या या उत्सवाची सांगता होते न होते तोच होळी उत्सवाला प्रारंभ होते.
या भोंगर्या बाजारासाठी तालुक्यातून तसेच मध्यप्रदेशातून अनेक व्यावसायिक आले होते.भोंगर्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. मोठ्या पालख्या, लहान मुलांसाठी पाळणा, खेळणी व विविध प्रकारची मिठाईची दुकाने थाटण्यात आली होती तसेच होळी सणाला लागणारे पूरक साहित्य विक्री करणारे व्यावसाहिक देखील मोठ्या प्रमाणात होते. यात भोपळे घुंगरू, डफ, ढोल, बाजे, झांज, बांसरी आदि साहित्य विक्रीसाठी आले होते तसेच विविध प्रकारचे आभुषणे,दैनदिन जीवनात उपयोगी ठरणारी मातीची भांडी,तसेच बाजारात सर्वात मोठ्या प्रमाणात दाळ्या, फुटाणे,गुळ, खोबरे इ.होळी उपयोगी पारंपारिक साहित्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.
बोराडी परिसरात सर्वात जास्त प्रमाणात आदिवासी गावे,व पाडे मोठ्या प्रमाणात जोडले असल्यानेे व जवळच मध्यप्रदेश राज्य असून परिसरातील सर्वात मोठा भोंगर्या बोराडी गावातच भरतो यामुळे एका दिवसात लाखों रुपयांची उलाढाल होते.
बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली