नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी
नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत (Primary Education Department) प्राथमिक शिक्षका पदवीधर शिक्षकांना (Primary teachers to graduate teachers) सेवाज्येष्ठतेनुसार (seniority)आयोजित पदोन्नती समितीच्या (Promotion Committee) बैठकीत 60 शिक्षकांना (teachers) मुख्याध्यापक पदावर (Promotion to the post of head master) पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. सदर पदोन्नती देण्यात आलेल्या शिक्षकांना पदोन्नतीने पदस्थापना देण्याकामी आज दि.25 एप्रिल 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 19 प्राथमिक शिक्षकांना नियमीत वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत पदोन्नती मुख्याध्यापक संवर्गाच्या रिक्त असलेल्या 67 पदांपैकी नंदुरबार तालुक्यात 10, नवापूर तालुक्यात 04. शहादा तालुक्यात 22 तळोदा तालुक्यात 10. अक्कलकुवा तालुक्यात 09 व धडगाव तालुक्यात 05 अशी एकूण 60 रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी आज समुपदेशन प्रक्रिया राबवून पसंतीने पदस्थापना देण्यात आली.
सदर प्रक्रिया पार पाडण्याकामी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.पी.जाधव व सतिष गावीत तसेच वरिष्ट सहाय्यक मिलिंद जाधव व उमेश पाटील, कनिष्ट सहाय्यक परेशकुमार वळवी, सुनिल गिरी, प्रशांत गोसावी, स्वप्नील पाटील, संगणक चालक आसिफ पठाण व योगेश रघुवंशी कार्यालयीन कर्मचारी शितल भदाणे यांनी परिश्रम घेतले.
19 शिक्षणसेवकांना नियमित वेतनश्रेणीचा लाभ
प्राथमिक शिक्षण विभागअंतर्गत पवित्र प्रणालीमार्फत सप्टेंबर 2019 मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 21 पैकी 19 शिक्षणसेवकांचा शिक्षण सेवक कालावधी संपुष्टात आणून त्यांना प्राथमिक शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीत सामावून घेण्यास मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय दि. 23 जून, 2017 मधील मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षक निवड पारदर्शक पद्धतीने करण्याकामी पवित्र (झअतखढठअ-झेीींरश्र ऋेी तळीळलश्रश ढे अश्रश्र ढशरलहशी ठशर्लीीळीांशपीं) ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर 2019 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात एकूण 21 शिक्षणसेवकांना नेमणूक देण्यात आलेली होती. संबंधित 21 शिक्षण सेवकांचा शिक्षणसेवक पदावरील तीन वर्षे कालावधी पूर्ण झाला असून पैकी समाधानकारकरित्या तीन वर्षे शिक्षणसेवक कालावधी पूर्ण करणार्या 19 शिक्षणसेवकांना प्राथमिक शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला. यात नंदुरबार तालुक्यातील 01, शहादा तालुक्यातील 13, अक्कलकुवा तालुक्यातील 03 व धडगांव तालुक्यातील 02 शिक्षकांचा समावेश आहे.
सदर प्रक्रिया पार पाडण्याकामी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण व निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.पी.जाधव, सतिष गावीत, वरिष्ठ सहाय्यक दिनेश वळवी, मिलिंद जाधव यांनी परिश्रम घेतले.