Sunday, September 29, 2024
Homeनंदुरबारधुळवद येथे 60 हजाराची बनावट दारु जप्त

धुळवद येथे 60 हजाराची बनावट दारु जप्त

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

नंदुरबार तालुक्यातील धुळवद गावात एका घराच्या पाठीमागे असलेल्या कुडाच्या छपर्‍यात 58 हजार 760 रूपयांचा देशी विदेशी दारु उपनगर पोलीसांनी जप्त केली असुन याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील धुळवद गावात राहणार्‍या रविंद्र भुर्‍या वळवी याने धुळवद गावात त्याचे घराच्या पाठीमागे असलेल्या कुडाच्या छपर्‍यात देशी विदेशी बनावट दारु ठेवलेली आहे.

या बाबत मिळालेल्या बातमी वरुन या ठिकाणी उपनगर पोलीसांनी छापा टाकला असता तेथे 58 हजार 760 रूपयांचा देशी विदेशी दारुचे 9 बॉक्स मिळुन आल्याने उपनगर पो.स्टेला रविंद्र भुर्‍या वळवी रा . धुळवद ता.जि.नंदुरबार याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जप्त करण्यात आलेला देशी विदेशी दारु ही गुडुभैय्या परदेशी ( रघुवंशी पुर्ण नांव माहित नाही ) रा.धुळवद ता.नंदुरबार ह.मु.नंदुरबार याचे धुळवद गावाच्या शिवारात असलेल्या त्यांचे घरात असलेल्या कारखान्यात त्याने व पंकज नामदेव चौधरी रा.नंदुरबार अशांनी मजुर राजु शांतीलाल पावरा , विजय बावला पावरा , सुरेश सत्तरसिंग पावरा , सर्व रा.बोराडी ता.शिरपुर व संतोष यादव चौधरी रा.नंदरबार यांचे कडुन बनावट दारु तयार करुन ती दारु रविंद्र भुर्‍या वळवी रा . धुळवद याचे घराच्या पाठीमागे असलेल्या कुडाचे छपर्‍यात ठेवले असल्याचे निष्पन्न झाले आहे .

संशयीत आरोपी रविंद्र भुन्या वळवी रा.धुळवद यास अटक करण्यात आली असुन उर्वरीत आरोपी यांचा शोध घेवुन अटक करण्याची कारवाई करीत, गुन्हयाचा तपास सुरु आहे . सदरची कारवाइ पोलीस अधिक्षकमहेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे यांचे मार्गदर्शना प्रमाणे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले , पोसई प्रशांत राठोड , पोहेको कैलास मोरे , पोना प्रेमचंद जाधव, पोहेकॉ सतिष ढोले व सोबत दारुबंदी विभागाचे मनोज संबोधी निरीक्षक, प्रशांत पाटील दुय्यम निरीक्षक व त्यांचे पथकांने केली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या