शिरपूर । Shirpur । प्रतिनिधी
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shirpur Agricultural Produce Market Committee ) निवडणुकीत (election) संचालकपदाच्या 18 जागांसाठी आज अखेर 61 अर्ज दाखल (applications filed) करण्यात आले. त्यानंतर आमदार अमरीशभाई पटेल गटातर्फे अधिकृत 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
बाजार समितीच्या संचालकपदाच्या 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असून 31 मार्चअखेर सात जणांनी अर्ज दाखल केले होते. माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल गटातर्फे उमेदवारी दाखल करण्यात आली.
गटनिहाय दाखल अर्जसंख्या अशी- सोसायटी मतदारसंघ : या मतदारसंघातील सर्वसाधारण गटात 19, महिला राखीव गटात 4, इतर मागासवर्गीय गटात 3 तर अनुसूचित जमाती गटातून 5 जणांनी अर्ज दाखल केले. ग्रामपंचायत मतदारसंघ: या मतदारसंघातील सर्वसाधारण गटात 4, अनुसूचित जाती-जमाती गटात 5 तर आर्थिक दुर्बल गटात 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
व्यापारी मतदारसंघ: या मतदारसंघातून 6 जणांनी 10 अर्ज दाखल केले. हमाल-मापाडी मतदारसंघ: या मतदारसंघासाठी 5 जणांनी 6 अर्ज दाखल केले. आ.अमरीशभाई पटेल, आ.काशीराम पावरा व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील गटाचे उमेदवार असे : सोसायटी मतदारसंघ- सर्वसाधारण: कांतीलाल दगा पाटील, किरण बद्रीनाथ गुजराथी, अरविंददास आनंदा पाटील, विठोबा सीताराम महाजन, शांतीलाल इंद्रसिंह जमादार, शिवाजी धनगर पाटील, चंद्रकांत (चंदू) धोंडू पाटील.
महिला राखीव: मेघा राजेंद्र पाटील, मनीषा राजकपूर मराठे, इतर मागासवर्गीय : प्रसाद मोहन पाटील. अनुसूचित जमाती: कृष्णा गेंदाराम पावरा. ग्रामपंचायत मतदारसंघ- सर्वसाधारण : लक्ष्मीकांत बापूराव पाटील, आनंदसिंह दर्यावसिंह राऊळ.
आर्थिक दुर्बल घटक :मिलिंद दौलतराव बोरसे (पाटील). अनुसूचित जाती-जमाती : जगन सुपा पावरा.
व्यापारी मतदारसंघ व हमाल मापाडी मतदारसंघाचे उमेदवार माघारीच्या नंतर जाहीर होतील. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांसोबत माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, स्वीय सहायक अशोक कलाल आदी उपस्थित होते.