Saturday, July 27, 2024
Homeनाशिकदिलासादायक : जिल्ह्यात करोनामुक्तचा आकडा ६३ हजार वर

दिलासादायक : जिल्ह्यात करोनामुक्तचा आकडा ६३ हजार वर

नाशिक । Nashik

नाशिक शहरत तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र मागील 24 तासात 1 हजार 758 रूग्णांंनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

यामुळे जिल्ह्यात करोनामुक्त होणारांचा आकडा 63 हजार 97 वर पोहचला आहे. हे करोना मुक्तीचे प्रमाण जिल्ह्यात 87 टक्केंवर पोहचले आहे. चोवीस तासात 1 हजार 424 रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 20 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 1 हजार 424 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 878 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 48 हजार 778 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 795 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 18 हजार 861 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 33 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 3 हजार 625 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 457 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 1 हजार 758 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 63 हजार 97 वर पोहचला आहे.

करोनामुळे आज 20 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 10 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 10 रूग्णाचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 295 इतका झाला आहे.

याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत आहे. 24 तासात 2 हजार 403 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 2 हजार 203, ग्रामिण व गृह विलगीकरण 156, मालेगाव 27, जिल्हा रूग्णालय 4, डॉ. पवार रूग्णालय 13 रूग्णांचा समाावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 71,721

* नाशिक : 48,778

* मालेगाव : 3,625

* उर्वरित जिल्हा : 18,861

* जिल्हा बाह्य : 457

* एकूण मृत्यू : 1295

* करोनामुक्त : 63,097

- Advertisment -

ताज्या बातम्या