नवी दिल्ली | New Delhi
65 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त (65 Maharashtra Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये भारताच्या विकासात महाराष्ट्राच्या योगदानाचे कौतुक करत राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहे. भारताच्या प्रगतीतील राज्याच्या योगदानाचे कौतुक केले. राज्याच्या ऐतिहासिक वारशाचे आणि विकासाच्या प्रतिबद्धतेचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेला महाराष्ट्र दिनाच्या (65 Maharashtra Day) शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. असे मोदींनी म्हटले आहे.