- Advertisement -
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज ६७.१४% टक्के मतदान झाले. दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधील १२१ विधानसभा जागांसाठी ६५ टक्के मतदान झाले होते तर आजच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात २० जिल्ह्यांमधील १२२ जागांसाठी मतदान झाले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपताच एक्झिट पोल समोर आले असून बिहारची जनता कोणाला कौल देणार, बिहार निवडणुकीत नव्याने उदयास आलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला किती जागा जिंकता येणार, बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच सरकार बनणार असल्याचं पाहायला मिळत आहे. बिहार निवडणुकीसाठी १४ नोव्हेंबर रोजी खरा निकाल जाहीर होईल तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.




