Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी 'इतके' टक्के मतदान

नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी ‘इतके’ टक्के मतदान

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात तब्बल ४८ ग्रामपंचायतीसाठी आज सरासरी ६७ टक्के मतदान झाले. मतदान होत असतांना एका ठिकाणी चांगलाच राडा झाला.सोमवारी (ता. 6) मतमोजनी होणार आहे.

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतिसाठी मतदान सुरू असतांना दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. धारगांव येथील ९ जागांपैकी ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. २ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. दोन महिला उमेदवारांचे पती आणि त्यांचे समर्थक एकमेकांना भिडले. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Eknath Khadse Heart Attack : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईत हलवणार

शिवसेनेत पडलेली फूट व माविआ सरकारचे पायउतार होणे, त्यानंतर राष्ट्रवादी कांँग्रेसमधील फूट या पार्श्वभूमीवर आज प्रथमच मतदारांचा कौल यातून समोर येणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसल्याने निकालांनंतर सगळेच पक्ष आपणच पुढे असल्याचा दावा करणार आहेत. मात्र मतदार नक्की कोणत्या बाजूने आहे याची स्पष्टता या निमित्ताने येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले. निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होत नव्हती तरी प्रत्येक ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीचे सूत्रधार होते. महायुतीतील तीन पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसत होते.

ग्रामपंचायत उमेदवाराच्या पतीवर रात्री झाला जीवघेणा हल्ला; दोन्ही गटात तुंबळ हाणामारी

आज इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी, धारगाव, शिरसाठे, नागोसली, ओडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दॉडत, उंबरकोन, सोमज, मोगरे, मोडाळे, कुशेगाव, बोरटेंभे, सोमज, मोगरे, मोंडाळे, कुशेगाव, बोरटेंभे, नांदगाव सदो गावे. तर मालेगाव तालुक्यातील मांजरे, दिंडोरी तालुक्यातील गवळवाडी.

तसेच, येवला तालुक्यातील लोकी शिरस, शिरसगाव लौकी, कळवण तालुक्यातील सरलेदिगर, कोसवन, कड़की, देसगाव, करंभेळ, तर निफाड तालुक्यातील पालखेड, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादेवनगर, सोमनाथनगर, मेटघरकिल्ला, साप्ते, सापगाव, हरसूल, देवळा तालुक्यातील मेशीर, माळवाडी, फुलेमाळवाडी, बागलाण तालुक्यातील चिराई, भवाडे, केळझर, भाक्षी, मुळाणे, केरसाणे, जामोटी, तताणी, नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर, गंगाम्हाळुगी, पिंपळगाव ग. सुभाषनगर आदी गावांत सार्वत्रिक निवडणूक झाली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या