Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्यासप्टेंबरपूर्वी 68 शाळा होणार ‘स्मार्ट’

सप्टेंबरपूर्वी 68 शाळा होणार ‘स्मार्ट’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेच्या काठे गल्लीतील अटल बिहारी वाजपेयी या स्मार्ट शाळेच्या अनावरणापाठोपाठ शहरातील 60टक्के शाळा या स्मार्ट करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. नाशिक महानगरात 69 शाळा उभारण्याच्या संकल्पनेला भारतात दुसरा क्रमांक मिळाल्याने स्मार्ट शाळा उपक्रमाला गती मिळाली आहे. या माध्यमातून शहरातील सर्व 68 शाळा सप्टेंबरपूर्वी स्मार्ट करण्याचा संकल्प हाती घेतला असल्याचे मनपाचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी सांगितले.

नाशिक महानगरातील 100 शाळांमध्ये 88 प्राथमिक व 12 माध्यमिक शाळा आहेत. त्यातून 28 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपाच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. मात्र शाळा उभारणीला विलंब होत असल्याने तो निधी इतर कामांना वर्ग करण्याचा विचार सुरु होता. मात्र स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पाठपुरावा करुन शाळेला महत्व असल्याचे निदर्शनास आणल्याने शाळांच्या विकासाचे टेंडर काढण्यात आले ते बेनेट कोलेमन कॉर्पोरेशनने हे काम हाती घेतले. त्यात शाळा दुरुस्तीचे काम मागे पडल्याने शाळा जून महिन्यात स्मार्ट करता आल्या नाहीत. मात्र आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शाळांच्या विकास कामांना गती देण्यात येत आहे.

शाळांच्या 656 वर्गखोल्यांचे नुतनीकरण करण्यात येत आहेे. शाळांचे वर्ग खोल्या, संगणक कक्ष, प्रवेशद्वार, लॉबी आदी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. वर्ग खोल्यांमध्ये आधुनिकतम इंटरॅक्टीव्ह पॅनेल बोर्ड लावण्यात येत आहे. यासर्व वर्ग खोल्यांचा थेट संपर्क शिक्षणाधिकार्यांच्या दालनात देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेतील शिक्षण प्रणाली कार्यालयातून पहाता येणार आहे. या सर्व यंत्रणांची देखभाल दुरुस्ती पॅलेडीअम कन्सल्टिंगच्या माध्यमातून 5 वर्ष केली जाणार आहे.

मनपा शाळांतील सर्व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याची सुविधा यातून उपलब्ध झालेली आहे. मनपाच्या मुलांना जागतीक स्तराच्या सुविधा देण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. शिक्षकांनाही या नुतन प्रणालीचे प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामाध्यमातून मुलांना आधुनिक शिक्षण देण्याची प्रणाली समजावून दिली जात आहे.

– बी.टी. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा

- Advertisment -

ताज्या बातम्या