मुंबई | प्रतिनिधी Mumbai
पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून आतापर्यंत जवळपास २ हजार ५४३ कोटी रुपये येवढा निधी मिळाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
सन २०२२-२३ चा अबंधित निधी ७२२ कोटी २७ लाख रुपये निधीचे वितरण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येणार असून सदर निधीमध्ये जिल्हा परिषदांना जवळपास १४.५९ कोटी रुपये, पंचायत समितीना १५.०१ कोटी आणि ग्रामपंचायतींना ६९२ कोटी ६७ लाख रूपये वितरीत करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
राज्यातील ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी या निधीच्या माध्यमातून मदत होणार असून ग्रामीण भागातील रस्ते, वाड्या वस्त्या, शेत रस्ते तसेच मूलभूत सोयी सुविधा युक्त कामांना गती मिळणार आहे, असेही महाजन म्हणाले.
संबंधित निधी उपलब्ध होण्यासाठी गिरीश महाजन यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांच्या सोबत पत्रव्यवहार तसेच प्रत्येक्षात भेटून सतत पाठपुरावा केला. यामुळे राज्याला भरघोस निधी उपलब्ध होण्यासाठी मदत झाली असून तो तत्काळ संबंधित विभागाच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणार आहे.