नवी दिल्ली | New Delhi
आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे (69 National Film Awards Ceremony) आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. २४ ऑगस्टला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे.
यावेळी बॉलिवूड, साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मधून अनेक दिग्गज सहभागी झाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट आणि क्रिती सेनन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक मराठी कलाकारांनी पुरस्कारावर नाव कोरले आहे.
‘एकदा काय झालं’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर आलिया भट्ट आणि अभिनेत्री कृती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच ‘गोदावरी’चे दिग्दर्शन निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या यादीत अभिनेता अल्लू अर्जुनच्या नावाचा समावेश आहे.पुष्पा: द राइज या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात येणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर क्रिती सॅननला तिच्या ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्टने’ सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे तर विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्सने ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कार जिंकला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी अभिनीत ‘शेरशाह’ या चित्रपटाने ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये विशेष ज्युरी पुरस्कार जिंकला आहे. करण जोहर ‘शेरशाह’ या चित्रपटाचा निर्माता आहे. तर पंकज त्रिपाठी यांनाही सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
शूजित सरकारच्या ‘सरदार उधम’ या ऐतिहासिक चित्रपटालाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा किताब जिंकण्याबरोबरच, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (अविक मुखोपाध्याय), सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (सिनॉय जोसेफ), सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन (दिमित्री मलिक आणि मानसी ध्रुव मेहता) आणि सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईन (वीरा कपूर ई.) असे पुरस्कारही मिळाले.
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळादरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले,”राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणं ही गर्वाची गोष्ट आहे. देशावर कोरोनाचे संकट असताना कलाकार मंडळींनी मनोरंजनाचे काम केले आहे. तुमच्यासारखी कलाकार मंडळी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. तुमचा कंटेट चांगला असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुम्हाला चांगली कामगिरी करता येईल”.