नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भुकंपाच्या तीव्र झटक्यांनी जपानला तडाखा दिला आहे. रिश्टर स्केलवर ७.१ येवढी तीव्रता नोंदवण्यात आली. भुकंपासोबत त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. नागरिकांन सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. तसेच मियाजाकी येथे समुद्रात रोजच्यापेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळत असल्याचे दिसत आहे. जपानच्या क्यूशू आणि शिकोकू बेटांवर या भुकंपाचे तीव्र झटके बसले आहे. मिळालेल्या माहितीनूसार क्यूशू शहर भुकंपाचे केंद्र बिंदू असून ८.८ किमी जमीनीखाली आहे. जपानच्या किनारी पट्टीवरील मियाझाकी, कोची, इहिमे, कागोशिमा आणि आहता या भागांना त्सुनामीचा अलर्ट देण्यात आला आहे.
- Advertisement -
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा