
दहिवड | मनोज वैद्य Dahivad
देवळा सौंदाणे फाटा रस्त्यावरील पिंपळगाव ( वा ) शिवारात दुचाकी व इर्टिगाकार यांच्यात झालेल्या अपघातात होऊन दोन जण जागीच ठार झाले असून अपघातास कारणीभूत असलेला चार चाकी वाहनचालक वाहन सोडून फरार झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक ७ ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी पाच वाजेचा सुमारास पिंपळगाव ( वा.) शिवारातील देवळा मालेगाव रोडवर देविदास पांडुरंग ठाकरे ( वय २६ ) व कैलास उर्फ तात्या पुंडलिक देवरे ( वय ५५ ) दोन्ही राहणार धोबीघाट, दहिवड, तालुका देवळा हे मोटारसायकल क्रमांक एम. एच. ४१ बी एस ३१५२ वर दहिवड कडून देवळ्याकडे जातं असतांना देवळ्याकडून मालेगाव कडे जात असलेल्या कार क्रमांक एम एच ०४ एच यू १२८९ यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात मोटारसायकल वरील दोघे जागेवरच ठार झाले. तर अपघातास कारणीभूत कार चालक कार घटनास्थळी सोडून फरार झाला. सदर घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.




