Tuesday, March 25, 2025
Homeब्लॉगभारतात चित्रपट झळकला ‘तो’ पहिला दिवस!

भारतात चित्रपट झळकला ‘तो’ पहिला दिवस!

लुमियर बंधू फ्रेंच सिनेमॅटोग्राफर होते जे पॅरिस मध्ये आपली उत्कृष्टता सिद्ध करून भारतात आले होते. त्यांनी भारतात पहिल्यांदा चित्रपट मुंबईमध्ये दाखवला. त्याकाळी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. या घटनेचा उल्लेख त्यावेळी शतकातील चमत्कार म्हणून झाला होता. त्यानंतर लुमियर बंधूंनी हे चित्रपट कोलकाता आणि चेन्नई या ठिकाणी प्रदर्शित केले.

७ जुलै १९८६ रोजी त्यांनी “एन्ट्री ऑफ सिनेमॅटोग्राफी”, “द सी बाथ”, “अरीवल ऑफ अ ट्रेन”, “अ डेमोलिशन”, “लेडीज अँड सोलजर्स ऑन व्हील्स” आणि “लिविंग द फॅक्टरी” हे चित्रपट प्रदर्शित केले. त्यानंतर लुमियर बंधूंनी बनविलेले दुसरे २४ चित्रपट १४ जुलै रोजी नोव्हेलटीज थिएटर, मुंबई येथे प्रदर्शित केले. त्यापैकी “अ स्टॉर्मी सी” आणि “द टेम्स अट वॉटरलु ब्रीज” हे चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा शो १५ ऑगस्ट १८९६ रोजी झाला.

- Advertisement -

लुमियर बंधूंनी केलेल्या चित्रपट प्रदर्शनानंतर भारतात मोठी चर्चा झाली. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी प्रोफेसर स्टीव्हनसनने कोलकाता येथील स्टार थिएटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला. स्टीव्हनसनचा कॅमेरा वापरुन हिरालाल सेन या भारतीय छायाचित्रकाराने त्या शोमधील दृश्यांची मोशन पिक्चर बनविली. ती म्हणजेच “द फ्लावर्स ऑफ पर्शिया”.

त्या नंतर एच.एस. भाटवडेकर यांनी १८९९ मध्ये मुंबईच्या हँगिंग ग्रेडन्समधील कुस्ती सामन्याचे चित्रण करून “रेसलर” हा चित्रपट बनवला. हा चित्रपट भारताचा पहिला माहितीपट होता. त्यानंतर काही दिवसात दादासाहेब तोरणे यांनी “श्री पुंडलिक” हा मूक मराठी चित्रपट बनवला.

भारतीय चित्रपसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांनी संस्कृत महाकाव्य एकत्र करून “राजा हरिश्चंद्र” हा चित्रपट बनवला. या चित्रपटात महिलांच्या भूमिका देखील पुरुषांनी केल्या होत्या. “राजा हरिश्चंद्र” हा चित्रपट भारतीय चित्रपसृष्टीसाठी उत्तम व्यावसायिक यश होते आणि आगामी चित्रपटांसाठी एक प्रेरणास्थान होते.

यानंतर चित्रपटसूष्टीचा सुवर्णकाळ सुरू झाला आणि आज ही तो सुरू आहे. पण भारतात चित्रपट आणण्याचे श्रेय लुमियर बंधूनाच जाते. त्यांनी भारतातील अनेक चित्रपट निर्मात्यांमध्ये चित्रपट निर्मितीची आग पेटवली.

– निलेश जाधव

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...