Wednesday, July 24, 2024
Homeनाशिकपानवेलींपासून विविध प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तु

पानवेलींपासून विविध प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तु

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

पंचवटीसह चांदोरी – सायखेडा याठिकाणी गोदावरी नदी पात्रात निर्माण होणार्‍या पानवेलींपासून आता विविध प्रकारच्या ७ ते ८ जीवनोपयोगी वस्तु बचतगटांमार्फत निर्माण करण्यात येणार आहे. या वस्तुंचे प्रशिक्षण अन् मार्केटिंगची जबाबदारी सेवाभावी संस्था करणार आहे.

नाशिक जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधीकारी अशीमा मित्तल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. चांदोरी सायखेडा येथे गोदावरीवर पाणवेलींचा थर साचतो. ग्रामस्थांच्या मदतीने गोदावरीला पानवेलींपासून मुक्त करण्यात येते. मात्र या पानवेली ठेवायच्या कुठे असा प्रश्न असतो, अशावेळी नीफ जीवन या सेवाभावी संस्थेशी चर्चा केली. पानवेलींपासून काही जीवनोपयोगी वस्तु तयार करण्यासाठी आसामहून दोन प्रशिक्षकही बोलविण्यात आले.

या प्रशिक्षकांमार्फत बचतगटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. महिलांनी या पानवेलींपासून चहाच्या कपाखालील कोस्टर बनवून दाखविले. अशाचप्रकारे पानवेलींपासून ७ ते ८ विविध प्रकारच्या वस्तु तयार करण्यात येणार आहे. या वस्तु बनविण्याचे मशीनही सेवाभावी संस्थेने या महिला बचतगटाला पुरविले आहे. यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर विविध वस्तुंची निर्मिती या पानवेलींपासून करण्यात येणार आहे. या वस्तुंचे ऑनलाईन मार्केटिंग सेवाभावी संस्थेकडून करण्यात येणार आहे अशी माहिती मित्तल यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या