Saturday, July 27, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार लोकसभा मतदार संघात 70.68 टक्के मतदान

नंदुरबार लोकसभा मतदार संघात 70.68 टक्के मतदान

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार लोकसभा मतदार संघात एकूण सरासरी ७०.६८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान नवापूर तालुक्यात तर सर्वात कमी मतदान शिरपूर विधानसभा मतदार संघात झाले.

- Advertisement -

नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी काल दिनांक १३ मे रोजी मतदान घेण्यात आले. महायुतीच्या खा.डॉ.हीना गावित तर महाविकास आघाडीचे ॲड. गोवाल पाडवी यांच्यात प्रमुख लढत झाली. राज्यात सर्वाधिक मतदान नंदुरबार लोकसभा मतदार संघात झाले. निकालाची अंतिम आकडेवारी आज प्राप्त झाली. यात संपुर्ण लोकसभा मतदार संघात एकूण सरासरी ७०.६८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.

मतदार संघात सर्वाधिक मतदान नवापूर विधानसभा मतदार संघात झाले.नवापूर विधानसभेत ८०.१८ टक्के मतदान झाले.त्यापाठोपाठ अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात ७५.०१ टक्के, शहादा विधानसभा मतदार संघात ७१.४९ टक्के, नंदुरबार विधानसभा मतदार संघात ६६.६७ टक्के, साक्री विधानसभा मतदार संघात ६७.६० टक्के, तर सर्वात कमी मतदान शिरपूर विधानसभा मतदार संघात ६५.०५ टक्के झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या