Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रदिलासादायक : बाधितांच्या तुलनेत दुप्पट करोना रुग्ण बरे

दिलासादायक : बाधितांच्या तुलनेत दुप्पट करोना रुग्ण बरे

मुंबई | Mumbai

करोनाचा कहर हळूहळू कमी होतांना दिसून येत आहे. राज्यात आज सात हजार ८९ करोना बाधितांची नोंद झाली असून त्याच्या दुप्पट रुग्ण झाले बरे झाले आहेत.

- Advertisement -

करोना विषाणूच्या बाबतील महाराष्ट्र हे देशात सर्वात बाधित राज्य आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये १५ हजाराच्या वर संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आज करोना बाधितांची संख्या आता ५ अंकावरून ४ अंकावर आली आहे.

राज्यात आज ७ हजार ८९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन १५ हजार ६५६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

अशाप्रकारे आतापर्यंत एकूण १२ लाख ८१ हजार ८९६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या २ लाख १२ हजार ४३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या