Tuesday, September 8, 2026
Homeदेश विदेश71st National Film Awards: ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; सर्वोत्कृष्ट मराठी...

71st National Film Awards: ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा मान ‘या’ चित्रपटाला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की, देशभरात मानाचा समजला जाणारा ‘ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘ मिळावा. अनेकांचे स्वप्न असणाऱ्या या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदा राष्ट्रीय पुरस्कारांचे 71वे वर्ष होते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री कोण ठरले? याबाबतची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.

मराठीतील या हा चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान ‘श्यामची आई’ या सिनेमाला मिळाला आहे. सुजय डहाके दिग्दर्शित या सिनेमात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्वरी गाडगीळ, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आचार्य अत्रे यांनी 1953 साली ‘श्यामची आई’ हा चित्रपट केलेला, त्यानंतर 2023 साली साने गुरुजी यांच्या 1933 सालच्या त्याच नावाच्या साहित्यकृतीवर बेतलेला नवा ‘श्यामची आई’ हा सिनेमा रीलिज झाला होता.

- Advertisement -

कोणा-कोणाला मिळाला पुरस्कार, वाचा संपुर्ण यादी
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमन
सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडू
सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म- भागावान्थ केसरी
सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पार्किंग
सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म- गॉडडे गॉडडे चा
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- शामची आई
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कथल
सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा- वश
सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा- डीप फ्रीजर
सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा- हनूमान
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)
सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- अॅनिमल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव
सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार- कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- उर्वशी, जानकी बोडीवाला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी
सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल
सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा- नाळ २


यापूर्वी पार पडलेल्या, ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, अभिनेता ऋषभ शेट्टीला कन्नड ब्लॉकबस्टर ‘कांतारा’मधील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नित्या मेनन (‘थिरुचित्रंबलम’) आणि मानसी परेख (‘कच्छ एक्सप्रेस’) यांना विभागून देण्यात आला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : सप्तशृंगीगड-नांदुरी घाटरस्ता ‘या’ तारखेपर्यंत बंद; ग्रामस्थांसह भाविकांचा विरोध

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptashrungigad सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटरस्त्याच्या (Saptashrungigad and Nanduri Ghat Road) काँक्रिटीकरणासाठी हा मार्ग येत्या १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून २६...