Monday, June 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूज71st National Film Awards: शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी ठरले सर्वोत्कृष्ट...

71st National Film Awards: शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते; मराठमोळा ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा १ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. आज २२ सप्टेंबर रोजी या सर्व विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीतल विज्ञान भवनमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मराठमोळ्या ‘श्यामची आई’ला पुरस्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘श्यामची आई’ साठी अमृता अरुणराव यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला. महाराष्ट्राची लाडाची नऊवारी नेसून पुरस्कार स्वीकारत अमृता अरुणराव यांनी मराठमोळ्या संस्कृतीचा मान वाढवला. साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित ‘श्यामची आई’ ही कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. ‘श्यामची आई’ने मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून दिला आहे.

- Advertisement -

https://www.instagram.com/reel/DO8fXgRjQvm/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

या सोहळ्यात शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी आणि मोहनलाल सारख्या अनेक अभिनेत्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने सन्मानित करण्यात येत आहे. भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम कलाकारांना त्यांच्या अमूल्य योगदानासाठी राष्ट्रीय चित्रपट २०२३ पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.

या वर्षीचे पुरस्कार बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी विशेष क्षण आहेत. सुपरस्टार शाहरुख खान विक्रांत मेस्सीसोबत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळेल. शाहरुख खानला ब्लॉकबस्टर ‘जवान’मधील भूमिकेसाठी तर १२ वी फेल चित्रपटासाठी विक्रांत मेस्सीला सन्मानित करण्यात येईल. महिला कॅटेगरीत, राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे मधील तिच्या प्रभावी भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मोहनलाल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रपटातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

विक्रांत मेस्सी- १२ वी फेल-सर्वोत्कृष्ट अभिनेता
शाहरुख खान-जवान-सर्वोत्कृष्ट अभिनेता
राणी मुखर्जी-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री Mrs. Chatterjee vs Norway
सॅम बहाद्दूर – मेघना गुलजार (दिग्दर्शिका)
रॉकी और रानी की प्रेम कहाणी करण जोहर (दिग्दर्शक)
अविनाश बेंडे- आत्मपॅम्फ्लेट
12th फेल विधू विनोद चोप्रा (दिग्दर्शक)

उत्पल दत्ता-सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक
ओडिया चित्रपट – द सी अँड सेव्हन विलेजेस – विशेष उल्लेखनीय सन्मान
उत्कृष्ट दिग्दर्शक – द सी अँड सेव्हन विलेजेस
मल्याळम चित्रपट- मेकल- विशेष उल्लेखनीय सन्मान
इंग्रजी चित्रपट- द सॅक्रेड जॅक- श्री हरिकृष्णन एस
इंग्रजी चित्रपट- मुवींग फोकस- निलादरी रॉय
हिंदी चित्रपट द फर्स्ट फिल्म – पियुष ठाकुर
कठहल – यथोवर्धन मिश्रा
रॉकी और रानी की प्रेम कहाणी – कोरिओग्राफर- वैभवी मर्चंट
सॅम बहाद्दूर – मेकअपमॅन-श्रीकांत देसाई
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- निधी गंभीर, दिव्या गंभीर
सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपट: फ्लॉवरिंग मॅन

फिचर फिल्म कॅटेगरी-
एव्हरी वन इज हिरो- मोहनदास
सर्वोत्कृष्ट संपादन- मिधुन मूरली-पुकल्लन
सर्वोत्कृष्ट ध्वनी- ॲनिमल (हिंदी) – हरिहरन मुरलीधरन
सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईन- ॲनिमल (हिंदी)-सचिन सुधाकरन
पटकथा लेखक- बेबी (तेलुगू)
संवाद लेखन- बस एक बंदा काफी है (हिंदी) – दीपक कंगरानी
छायांकन- प्रशांत मोहपात्रा- द केरळ स्टोरी पी व्ही एन एस रोहित – बेबी (तेलुगू)
वरील दिग्गजांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्ण कमळ, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बालकलाकार – भार्गव सुनीता जगताप (मराठी चित्रपट नाळ)
नाळ-२ श्रीनिवास पोकळे – नाळ -२ (मराठी चित्रपट)
त्रिशा विविक ठोसर – नाळ -२ (मराठी चित्रपट)
कबीर खंडारे – जिप्सी (मराठी चित्रपट)

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Abhijeet Dipke : जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके...

0
जयपूर । Jaipur सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली डिजिटल राजकीय चळवळ, अर्थात 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर जयपूरमधील एका आंदोलनादरम्यान जीवघेणा...