Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याप्रसादातून भाविकांना विषबाधा

प्रसादातून भाविकांना विषबाधा

ठाणगाव | वार्ताहर Thangaon

अखंड हरिनाम सप्ताहात समारोपाच्या काल्याच्या कीर्तनानंतर झालेल्या महाप्रसाद सेवनानंतर 72 भाविकांना विषबाधा झाल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथे आज दुपारी घडली आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. अंत्यवस्थ झालेल्या एकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, योगीराज ठाकरे (वय 58) असे भाविकांचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बार्‍हे जवळील ठाणगाव येथे हनुमान जन्मोत्सवनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज शुक्रवार रोजी शेवटचा दिवस होता. महाप्रसाद आणि काल्याचे किर्तन असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकरा वाजता काल्याचे कीर्तन आटोपल्यानंतर भाविकांना दहीकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला तो प्रसाद त्यांनी खालल्यानंतर एक एक भाविकाला उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बार्‍हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उपचारासाठी सुमारे 70 भाविक दाखल झाले होते. त्यामध्ये 20 ते 25 लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते. यामुळे बार्‍हे ग्रामीण रुग्णालयात एकच धावपळ उडाली. कर्मचारी संख्या कमी असल्याने अडचण निर्माण झाली. अशावेळी तत्काळ बार्‍हे, मनखेड व आंबूपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका यांना बार्‍हे येथे पाठविण्यात आल्याने रूग्णांवर वेळीच उपचार करण्यास मदत झाली. सद्यस्थितीत सर्व रूग्ण स्वस्थ असून प्रकृतीत सुधारणा होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

केवळ ठाणगाव येथील योगीराज पांडू ठाकरे (55) यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या परिसरातील तलाठी देखील मदत करत आहेत. काल्याच्या प्रसादातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यादरम्यान माजी सभापती मंदाकिनी भोये, मनिषा महाले, गोपाळ धूम, देविदास गावित, गणपत महाले, हुशार देशमुख, चिंतामण वार्डे आदींनी रूग्णालयात धाव घेऊन सर्वतोपरी सहकार्य केले. बार्‍हे ग्रामीण रुग्णालयात 108 म्बुलन्स नसल्याने अनेकांनी यावेळी नाराजी व्यक्त करत 108 म्बुलन्स ची मागणी केली आहे.

पालकमंत्र्यांच्या यंत्रणेला सूचना

सुरगाणा तालुक्यातील ठानपाडा येथे 50 ते 52 व्यक्तींना अन्नातून विष बाधा झाल्याची घटना घडल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे आणण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीबाबत पालकमंत्री दादाजी भुसे संपर्कात असून सर्व यंत्रणेला सर्वोतोपरी मदतीचे निर्देश दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांना घटनास्थळी पाहणी करण्याच्या सूचना दिल्या प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या संपर्कात आहेत.

ठाणगाव येथील झालेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर बार्‍हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांवर वेळीच उपचार मिळावेत यासाठी बार्‍हे, मनखेड, आंबूपाडा येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका आदींना तातडीने पाठविण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी यांना तसेच संबंधितांना त्याबाबत सुचना देण्यात आली. आता रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

सचिन मुळीक, तहसिलदार, सुरगाणा.

विषबाधितांची नावे…

1) मधुकर महाले, 2)दिपक सुरकार, 3)छगन महाले, भास्कर भोये, 4)देवयानी महाले, 5)मनोहर ठाकरे, 6)लक्ष्मण गायकवाड, 7)जिजाबाई गायकवाड, 8)नरेंद्र ठाकरे 9)धनश्री धूम, 10)गणेश धूम 11)हेमराज महाले 12)प्रीती महाले 13)हौसाबाई गायकवाड 14)माणिक वार्डे 15)विलास ठाकरे 16)सुनिल ठाकरे 17)खुशाली ठाकरे 18)दिनेश ठाकरे 19हेमराज ठाकरे 20)संगीता महाले 21)लता राऊत 22)सुनील वार्डे 23)देवका महाले 24)जमुनाबाई वार्डे 25)प्रियंका पाडवी 26)गोरखनाथ महाले 27)मिराबाई गायकवाड 28)देवकीबाई महाले 29)लताबाई महाले, 30)मधुकर ठाकरे 31)योगीराज ठाकरे 32)अक्षय जाधव 33)हेमलता महाले 34)यश गोरखनाथ महाले, 35)समीर महाले, 36)पुष्पराज महेंद्र महाले, 37)अनिता महेंद्र महाले, 38)महेंद्र महाले, 39)पूजा महाले, 40)रमेश महाले 41)जागृती महाले, 42)शोभा गायकवाड 43)उदय महाले 44)प्रणाली महाले 45)पुष्कराज महाले 46)मनिषा गायकवाड 47)विलास ठाकरे 48)अश्विन महाले 49)खुशाल वार्डे 50नितीन भोये 51)तेजस महाले 52जिया झिरवाळ 53)भक्ती पवार 54)ज्ञानेश्वर महाले 55)मनोहर महाले 56)प्रमोद महाले 57)जयराम वार्डे 58)आरती महाले 59)चंद्राबाई महाले 60)यशोदा) ठाकरे, 61) पदमा चौधरी 62)पवना ठाकरे 63)राणी गावित 64)उन्नती ठाकरे 65)निर्मला महाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या