Monday, May 26, 2025
Homeदेश विदेशEarthquake : अमेरिकेच्या अलास्कात शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा Alert जारी

Earthquake : अमेरिकेच्या अलास्कात शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा Alert जारी

दिल्ली | Delhi

- Advertisement -

अमेरिकेतील अलास्काच्या किनारपट्टीवर आज भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टल स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.४ असल्याचे सांगण्यात आले आहे. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की त्यांच्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपामुळे भीषण विध्वंस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण अद्याप भूकंपामुळे किती नुकसान झाले याची नेमकी माहिती समोर आलेली नाही.

यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ९.३ किमी अंतरावर होता. अलास्का पेनिनसुला (Alaskan Peninsula), अलउतेइअन बेट (Aleutian Island), कूक इनलेट (Cook Inlet) या भागांना भूकंपाचे हादरे बसले. प्रशांत महासागरातील (Pacific Ocean) रिंग ऑफ फायर (Ring of Fire) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात अलास्का आहे.

याआधी अलास्काला १९६४ च्या मार्चमध्ये ९.२ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. हा उत्तर अमेरिकेत नोंदवला गेलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंपाचा हादरा होता. यानंतर सूनामी आली होती. या दुहेरी धक्क्यामुळे एंकोरेज (Anchorage), अलास्काचा खाडी प्रदेश (Gulf of Alaska), अमेरिकेचा पश्चिमेचा समुद्र किनारा (US west coast) आणि हवाई बेटांचा समूह (Hawai) येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. भूकंप आणि सूनामी अशा दुहेरी धक्क्यात कमी लोकवस्तीच्या या भागात २५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती.

“ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी…”; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

  • धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

  • मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

  • याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी.

  • त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा.

  • जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे.

  • याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात काल रविवारीही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार पाऊस कोसळला. दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या या पावसाचा जोर...