मुंबई | Mumbai
१५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. यंदा भारत ७५ व्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day) अमृत दिवस साजरा करत आहे. पण, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी १५ ऑगस्ट ही तारीख इंग्रजांनी का निवडली हे तुम्हाला माहित आहे का? याचा कधी तुम्ही विचार केला का? तर जाणून घ्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रजांनी हाच दिवस का निवडला …
ब्रिटिश संसदेनं लॉर्ड माउंटबेटन (Lord Mountbatten) यांना ३० जून १९४८ पर्यंत भारताची सत्ता भारतीयांना देण्याचे अधिकार दिले होते. लॉर्ड माउंटबेटन यांना १९४७ साली भारताचे अखेरचे व्हाईसराय (Viceroy) म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. यानंतर माउंटबेटन (Mountbatten) यांनीच भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी १५ ऑगस्ट ही तारीख निवडली होती.
काही इतिहास तज्ज्ञांनुसार असं ही म्हटलं जातं की, सी. राजगोपालचारी (C. Rajagopalachari) यांच्या सल्ल्यानंतर लॉर्ड माउंटबेटन यांनी ही तारीख निवडली होती. सी. राजगोपालचारी यांचं म्हणणं होतं की, जर ३० जून १९४८ पर्यंत वाट पाहावी लागली तर हस्तांतरित करण्यासाठी कुठलीही सत्ता उरणार नाही.
याचाच विचार करत भारताचे अखेरचे व्हाईसराय माउंटबेटन (Viceroy Lord Mountbatten) यांनी १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य दिलं. तर काही जणांचं म्हणणं आहे की, १५ तारीख शुभ मानली जाते, त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यासाठी हा दिवस निवडला गेला. अशाप्रकारे १५ ऑगस्ट तारीख का निवडली गेली, याबाबत अनेक मत-मतांतरं आहेत.
इंग्रजांनी स्वातंत्र्य देण्याची घोषणा केल्यानंतर ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमंसमध्ये (British House of Commons) ४ जुलै १९४७ ला इंडियन इंडिपेंडेंस बिल (Indian Independence Bill) सादर केलं गेलं. या बिलामध्ये भारताची फाळणी (Partition of India) आणि पाकिस्तानला (Pakisthan) वेगळा देश बनविण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता.
हे बिल १८ जुलै १९४७ रोजी स्वीकारलं गेलं आणि १४ ऑगस्टला फाळणी झाल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला मध्यरात्री १२ वाजता भारत देश स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केली गेली होती. अशा पद्धतीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ या खास दिवसाची निवड करण्यात आली. आता हा दिवस अब्जावधी भारतीयांसाठी (Indian) खास झाला आहे.