Tuesday, March 25, 2025
Homeनगरशेअर्सच्या नावाखाली 76 लाखांची फसवणूक

शेअर्सच्या नावाखाली 76 लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) करून त्या बदल्यात चांगला परतावा देण्याचे आमिष (Lure) दाखवत व्यावसायिकाची तब्बल 46 लाख रुपयांची व एका नोकरदराची 30 लाख रुपयांची अशी एकूण 76 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजेंद्र जगन्नाथ ससाणे (वय 53, रा. सारसनगर) व श्रीकांत ज्ञानदेव तवले (वय 31, रा. जेउर, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) फसवणूक व ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

निकेश सुरेश शिंदे (रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. निकेश शिंदे याने ससाणे यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष (Lure) दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेऊन 20 डिसेंबर 2020 ते 13 नोव्हेंबर 2021 या काळात ससाणे यांनी शिंदे याला वेळोवेळी 46 लाख रुपये त्याच्या खात्यावर जमा केले. तसेच, तवले यांनीही शिंदे यास वेळोवेळी 30 लाख रुपये दिले.

मात्र, शिंदे याने ससाणे व तवले यांना मुद्दल अथवा परताव्याची रक्कम परत न देता दोघांची 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार पोलिसांनी फसवणूक व एमपीआयडीनुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे व साळुंके करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : यंदा २०० पाणी टँकरचे नियोजन; जिल्हा प्रशासनाचा टंचाई...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जिल्हा प्रशासनाने (District Administration) यंदाही पाणीपुरवठ्यासाठी टंचाई आराखडा जाहीर केला आहे. त्यात यंदा चांगला पाऊस (Rain) झाल्याने गतवर्षाच्या तुलनेत टँकरला...