चांदवड | प्रतिनिधी Chandwad
चांदवड नगरपरिषदेच्या उर्वरित एका जागेसाठी मतदान प्रक्रिया आज शनिवार दि २० रोजी पार पडली.यावेळी २०६० मतदारांपैकी १६०० इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सरासरी इतके ७७.६६ टक्के मतदान झाले.मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आलेली चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग ३ अ जागेसाठी आज येथील गुंजाळ विद्यालय दोन मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.या प्रभागात १०३३ पुरुष व १०२७ महिला मिळून एकूण २०६० मतदार आहेत त्यापैकी ८१३ पुरुषांनी व ७८७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावल्याने १६०० एकूण मतदान झाले.
सरासरी ७७.६६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली.मतदान केंद्र तसेच परिसरात पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
दरम्यान २ डिसेंबर रोजी ३ ब साठी झालेल्या मतदानावेळी २०६० मतदारांपैकी १५३० मतदान झाले होते सरासरी ७४.२७ टक्के मतदान झाले होते मागच्या वेळच्या तुलनेत ७० मतदान अधिक झाले आहे.




