Saturday, September 14, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ७८ हजारांवर

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ७८ हजारांवर

नाशिक । Nashik

- Advertisement -

जिल्ह्यात मागील चोवीस तासात 1 हजार 430 रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा 78 हजार 414 वर पोहचला आहे. तर जिल्ह्यात 19 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 1 हजार 430 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 851 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 52 हजार 970 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 552 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 21 हजार 145 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 20 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 3 हजार 781 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 518 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 853 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 68 हजार 45 वर पोहचला आहे.

करोनामुळे आज 19 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 8 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 8, मालेगाव येथील 2 तर जिल्हा बाह्य 1 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 410 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत आहे.

24 तासात 2 हजार 611 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 2 हजार330, ग्रामिण व गृह विलगीकरण 235, मालेगाव 29, जिल्हा रूग्णालय 8, डॉ. पवार रूग्णालय 9 रूग्णांचा समाावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या