Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्या७८० एसटी चालकांचा आज सत्कार

७८० एसटी चालकांचा आज सत्कार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

एसटी महामंडळाच्या (MSRTC )सेवेत गेली २५ वर्ष विना अपघात सेवा (25 years accident-free service )बजावणाऱ्या ७८० चालकांचा सपत्नीक सत्कार आज, गुरुवारी प्रजासत्ताकदिनी ( Republic Day of India)केला जाणार आहे.

प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी आणि रोख २५ हजाराचा धनादेश असे सत्काराचे स्वरूप आहे. राज्यभरात प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये विभाग नियंत्रक यांच्या हस्ते आणि मुख्यालयात उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते सदर चालकांचा सत्कार होणार आहे.

सद्यस्थितीला एसटी महामंडळाकडे २४ हजार ३८९ चालक कार्यरत आहेत. विना अपघात सेवा करण्याऱ्या चालकांचा सत्कार हा इतर चालकांना प्रेरणादायी ठरावा आणि भविष्यात अपघात विरहीत सेवा देणाऱ्या चालकांची संख्या वाढून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी सर्व चालकांनी घ्यावी अशी अपेक्षा असल्याचे महांमडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

दरम्यान, आज मुंबई विभागातील ८४, नाशिक विभागातील ८९, औरंगाबादमधील १५१, नागपूरच्या ६९, पुण्यातील १९७, नाशिक आणि अमरावती विभागातील १८३ अशा ७८० एसटी चालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या