Sunday, April 6, 2025
Homeधुळेराष्ट्रीय लोकअदालतीत 8 हजार 870 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीत 8 हजार 870 प्रकरणे निकाली

धुळे/प्रतिनिधी- Dhule

जिल्ह्यात आज राष्ट्रीय लोकअदालतीत १हजार १७३ प्रलंबित प्रकरणे व दाखलपुर्व ७ हजार ६९७ प्रकरणे अशी एकूण 8 हजार 870 प्रकरणे समोपचाराने निकाली निघाली. तर 24 कोटींची नुकसान भरपाई वसुल करण्यात आली.

- Advertisement -

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली National Legal Services Authority, Delhi यांच्या आदेशान्वये जिल्हयात आज दि १ ऑगस्ट रोजी जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयातील प्रलंबित ५ हजार ३३४ प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच वादपुर्व ४७ हजार ९४६ प्रकरणे ज्यामध्ये महानगरपालिका कर वसुलीचे प्रकरणे, ग्रामपंचायत पाणीपट्टी थकबाकीचे प्रकरणे, बँकेची थकबाकी प्रकरणे, महावितरण

कंपनीचे प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे आदी ठेवण्यात आली होती. सदर प्रकरणांमध्ये प्रलंबित प्रकरणे १ हजार १७३ व दाखलपुर्व ७ हजार ६९७ प्रकरणे समोपचाराने निकाली निघाली. लोकअदालतमध्ये एकुण २४ कोटी ४२ लाख ३० हजार २९७ रूपयांची नुकसान भरपाई व वसुली झाली. त्यामध्ये महानगरपालिकेचे ६ कोटी रुपयांची वसूली झाली आहे. तसेच जिल्हयातील ग्रामपंचायतींचे देखील एकुण ६२ लाख रूपयांची थकबाकी वसूल झाली आहे. तसेच कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी निर्देशित केल्यानुसार सामा या संस्थेमार्फत खटल्यांची ऑनलाईन पध्दतीने तडजोड करण्यात आली. त्यामध्ये एकुण १७७ खटले हे

ऑनलाईन पध्दतीने तडजोड करण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी एकुण ४१ खटले ऑनलाईन पध्दतीने निकाली निघाले. त्यामुळे बाहेरगावी असलेले पक्षकार व वकील यांची सुविधा झाली आहे. लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. लोकन्यायालय यशस्वी होण्याकरिता जिल्हा वकील संघ, पोलिस अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व न्यायाधीश यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. तसेच महापालिकेच्या वतीने लोकन्यायालय यशस्वी होण्याकरिता मोठे सहकार्य करण्यात आले. त्यामुळे त्यांचे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : मंगलमय वातावरणात साईनगरीत श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित रामनवमी उत्सवास शनिवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून साई नामाने साईनगरी दुमदुमून गेली...