Saturday, July 27, 2024
Homeधुळेजिल्ह्यातील 8 गावे ‘ओडीएफ प्लस’ घोषित

जिल्ह्यातील 8 गावे ‘ओडीएफ प्लस’ घोषित

धुळे Dhule । प्रतिनिधी

स्वच्छ भारत मिशन Swachh Bharat Mission (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींना Gram Panchayat 15 ऑगस्ट रोजी हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) असल्याचे घोषित केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार Deputy Chief Executive Officer of Zilla Parishad’s Water and Sanitation Department Pradip Pawar यांनी दिली.

- Advertisement -

केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 ची अंमलबजावणी करण्यात येते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या पहिल्या टप्प्यात गाव हागणदारी मुक्तीवर भर देण्यात आला होता. आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

याबद्दल अधिक माहिती देतांना श्री. पवार यांनी सांगितले की, वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची कामे पूर्ण करून जिल्ह्यात हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मानांकनाचा दर्जा प्रदान करणे करिता नियोजनबद्धरीत्या विविध निकषांची पूर्तता करून जिल्ह्यातील सर्व गावे टप्प्या टप्प्याने हागणदारीमुक्त अधिक घोषित करायची आहेत.

पहिल्या टप्प्यात 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 8 गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात आली. यामध्ये धुळे तालुक्यातील भिरडाणे, विसरणे. साक्री तालुक्यातील मलांजन, लोणखेडी, शिंदखेडा तालुक्यातील वडदे, सुलवाडे व शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड तसेच जैतपुर या गावाचा समावेश आहे.

या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांनी गाव हागणदारीमुक्त अधिक असल्याचे घोषित केले. हागणदारीमुक्त अधिक म्हणजे ग्रामीण जीवनातील गावांसाठी हागणदारीमुक्ततेचे मानांकन प्राप्त गावांमध्ये शौचालयाचे बांधकाम पुनर्प्रस्थापित करणे, सामुदायिक शौचालय संकुल घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व इतर अनुषंगिक कामे पूर्ण करून स्वच्छता शाश्वतरित्या कायम ठेवणे होय.

- Advertisment -

ताज्या बातम्या