Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात साहित्य संमेलनाच्या आयोजनावर भुजबळ म्हणाले...

नाशकात साहित्य संमेलनाच्या आयोजनावर भुजबळ म्हणाले…

नाशिक: Nashik

नियोजित 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (sahitya samelan) नाशिकमध्ये मार्चमध्ये होणार होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सदरचे संमेलन स्थगित करण्यात आले होते. आता अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी लोकहितवादी मंडळाला पत्र लिहिले आहे. त्यात साहित्य संमेलनाबाबत भूमिका ३१ जुलै पर्यंत कळवण्याचे म्हटले आहे. त्यानंतर नाशिकमधील साहित्य संमेलनावर पुन्हा चर्चा सुरु झाली. रविवारी पालकमंत्री व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी भूमिका स्पष्ट केली.

- Advertisement -

नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी कोरोना विषाणू ससंर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाचे आयोजन करणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पालकमंत्री भुजबळ यांना पत्र पाठवून संमेलन होणे शक्य आहे का आणि तारीख कळवावी असे पत्र पाठवले होते. त्यावर छगन भुजबळ यांनी रविवारी माध्यमांशी बोलतांना म्हटले की, कोरोनाच्या दुसरा लाटेतून नाशिक कर आता कुठे सावरत आहे. त्यात पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यामुळे गर्दी होण्याचा धोका जास्त वर्तवला जात आहे. त्यामुळे हजार-दोन हजार जणांची गर्दी होईल, असे साहित्य संमेलन घेणे शक्य नाही. साहित्य संमेलनामुळे जास्त व्यक्ती एकत्र येतील आणि ते सध्याच्या परिस्थितीला धोकादायक ठरू शकते. गर्दी टाळण्यासाठी आम्हीदेखील ओबीसी आंदोलन (obc andolan) थांबवले आहे असे भुजबळांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी साहित्य संमेलन आयोजित करणे अशक्य असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

संमेलन घेण्यासारखी परिस्थिती आहे का?

यापुढे स्वागतमंडळाची व निमंत्रक संस्थेची या साहित्य संमेलनासंबंधी काय भूमिका असणार आहे? हे जाणून घेणे व आपले म्हणणे महामंडळाला अवगत करून देणे आवश्यक वाटते. आज कोरोनाची परिस्थिती नाशिकला साहित्य संमेलन घेण्यासारखी आहे का ? महाराष्ट्र शासन व नाशिकचे प्रशासन संमेलन घेऊ देण्यास अनुकूल प्रतिसाद देतील का ?

नाशिकमधील व जिल्ह्यातील लोकांची संमेलन घेण्याबाबत या परिस्थितीत मनःस्थिती कशी आहे? आणि मुख्य म्हणजे आयोजक संस्था म्हणून आपली व लोकहितवादी मंडळाची व स्वागतमंडळाची याही परिस्थितीत वरील सर्व गोष्टींवर मात करून साहित्य संमेलन घेण्याची तयारी आहे का ? तयारी असेल तर कधीपर्यंत म्हणजे कोणत्या महिन्याच्या कोणत्या आठवड्यात संमेलन घेण्याची तयारी आहे ?

महाराष्ट्र शासनाने (वर्ष उलटून गेल्यामुळे) अनुदान नाकारले तर आपण काटकसरीचा मार्ग अनुसरला तरीही आटोपशीर साहित्य संमेलनाला आवश्यक असणारा निधी जमा होईल का ? ह्या सर्व प्रश्नांचा विचार करून संमेलनासंबंधीची लोकहितवादी मंडळाची व स्वागतमंडळाची भूमिका स्पष्टपणे कळवावी.

आपली भूमिका जाणून घेतल्यावर संमेलन आणखी दीडेक महिना स्थगित करायचे की, तूर्त या वर्षी नाशिकपुरते साहित्य संमेलनच रद्द करायचे आणि झालेली संपूर्ण प्रक्रिया रद्द करून सर्वांना यातून मुक्त करायचे यासंबंधीचा निर्णय साहित्य महामंडळाला घेता येईल. त्यापूर्वी निमंत्रक म्हणून आपली भूमिका कळणे मला आवश्यक वाटते.

ती ३१ जुलै २०२१ पर्यंत कळवावी अशी विनंती आहे. आपण काहीच कळविले नाही तर आपण आता साहित्य संमेलन घेण्यास उत्सुक नाही असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आपण आपली व लोकहितवादी मंडळाची भूमिका स्पष्टपणे कळविणे आवश्यक आहे.

यासंबंधात आपणांस माझ्याशी आणखी काही चर्चा करावयाची असल्यास ती आपण मोकळेपणाने करू शकता. यातून योग्य मार्ग निघाला व साहित्य संमेलन झाले तर साहित्य महामंडळालाही नाशिककरांप्रमाणेच आनंद होईल. असे ठाले पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या