Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयात दहावीचा ९४.९७ टक्के निकाल

नंदुरबार जिल्हयात दहावीचा ९४.९७ टक्के निकाल

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता (ssc) दहावीच्या (Examination) परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन (Online) जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयाचा एकुण निकाल ९४.९७ टक्के लागला. तर पुनर्परिक्षार्थींचा निकाल ५९.२४ टक्के लागला. (nashik) नाशिक विभागात सर्वात कमी निकाल नंदुरबार जिल्हयाचा लागला आहे.

- Advertisement -

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

नंदुरबार जिल्हयात २० हजार २५ नियमीत विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १९ हजार १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयाचा एकुण निकाल ९४.९७ टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ९४९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ७ हजार ३५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ हजार ५९७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ११८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शहादा तालुक्याचा सर्वाधिक निकाल

नंदुरबार जिल्हयात शहादा तालुक्याचा सर्वाधिक तर तळोदा तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. अक्कलकुवा तालुक्यात २ हजार ५२६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २ हजार ३७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १ हजार १८७ विद्यार्थी व १ हजार १८९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. अक्कलकुवा तालुक्याचा ९४.०६ टक्के निकाल लागला.

धडगाव तालुक्यात १ हजार ३४२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १ हजार २७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ५९७ विद्यार्थी व ६७५ विद्यार्थिनींचा समावेश आहे. धडगाव तालुक्याचा ९४.७८ टक्के निकाल लागला.

नंदुरबार तालुक्यात ५ हजार ७१० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५ हजार ४४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २ हजार ९३४ विद्यार्थी व २ हजार ५११ विद्यार्थिनींचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्याचा ९५.३५ टक्के निकाल लागला.

नवापूर तालुक्यात ३ हजार ५७२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १ हजार ७९० विद्यार्थी व १ हजार ६२२ विद्यार्थिनींचा समावेश आहे. नवापूर तालुक्याचा ९५.५२ टक्के निकाल लागला.

शहादा तालुक्यात ५ हजार ४१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ४ हजार ८४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २ हजार ६२८ विद्यार्थी व २ हजार २१९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. शहादा तालुक्याचा ९६.१५ टक्के निकाल लागला.

तळोदा तालुक्यात १ हजार ८३४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १ हजार ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ८६६ विद्यार्थी व ८०० विद्यार्थिनींचा समावेश आहे. तळोदा तालुक्याचा ९०.८३ टक्के निकाल लागला.

पुनर्परिक्षार्थींचा ५९.२४ टक्के निकाल

जिल्हयात ३४६ पुनर्परिक्षार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १४३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परिक्षार्थींचा निकाल ५९.२४ टक्के लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या