Tuesday, March 25, 2025
Homeक्राईम95 लाखांच्या सायबर फ्रॉड प्रकरणी नाशिकमधून तिघे जेरबंद

95 लाखांच्या सायबर फ्रॉड प्रकरणी नाशिकमधून तिघे जेरबंद

धुळे (प्रतिनिधी)- शहरातील अवधान एमआयडीसीतील महाराष्ट्र ऑईल एक्सट्रक्शन कंपनीची तब्बल 95 लाखात ऑनलाइन फसवणूक झाली होती. या सायबर फ्रॉडप्रकरणी सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने नाशिक मधून दोघांना तर चांदवड येथून एकास पाठलाग करुन पकडले. तिघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

महाराष्ट्र ऑईल एक्सट्रक्शन प्रा. लि. कंपनीचा डायरेक्टर शैलेंद्र अग्रवाल असल्याचे भासवित अज्ञात आरोपीने कंपनीचे अकाऊंटंट यांना व्हाट्सअपवर मेसेज करुन एका नवीन प्रोजेक्टची बोलणी फायनल झाली असून त्या प्रोजेक्टचा ॲडव्हान्स भरण्यासाठी तात्काळ 95 लाख रुपये दिलेल्या आरटीजीएसव्दारे रक्कम भरण्यास सांगितले. मोबाईलवर असलेल्या व्हाट्सअप डीपीवर कंपनीच्या मालकाचा फोटो पाहून मेसेज हा मालकांनी केल्याचे अकाऊंटंट याना वाटले. त्यामुळे त्यांनी तात्काळ 95 लाख रुपये आरटीजीएसव्दारे ट्रान्सफर केले. त्यानंतर पुन्हा अज्ञात आरोपीने दुसऱ्या दिवशी 85 लाखांची मागणी केल्याने अकाऊटंट यांनी कंपनीच्या इतर मालकांकडे हीबाब सांगितली. तेव्हा त्यांना सायबर फ्रॉड झाल्याचे लक्षात आले. याबाबत संजय भगीरथ अग्रवाल (रा. वल्लभ नगर, धुळे ) यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश घुसर यांनी पथक तयार केले. तपास चक्र फिरवून गुन्हयातील आरोपी हे नाशिक येथे असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार पथकाने नाशिक येथुन मुजम्मील मुस्तक मनियार, (वय 25), सरफराज हुसैन शेख ( वय 27) यांना ताब्यात घेतले. तसेच चांदवड येथून आवेश रफिक पिंजारी यास पाठलाग करुन पकडले. तिघा आरोपीतांना अटक करुन आज दि.21 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 25 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisement -

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याची निरीक्षक सुरेश घुसर, असई संजय पाटील, पोहेकॉ भुषण खलाणेकर, राजु मोरे, पोकॉ तुषार पोतदार, चेतन सोनगीरे, प्रसाद वाघ, विवेक बिऱ्हाडे, महेंद्र जाधव यांच्या पथकाने केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...