धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात एकाच दिवसात 95 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत बाधितांची संख्या दोन हजार 860 वर गेली आहे.
जिल्हा रुग्णालय येुथील तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात साक्रीरोड, फागणे आणि अजबेनगर प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. भाडणे येथील पिंपळनेर दत्त मंदीर येथील दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
महापालिका पॉलिटेक्निक सीसीसी येथील 35 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात महात्मा स्वीट, साक्रीरोड गणेश कॉलनी, इंदिरा कॉलनी, नगावबारी, नकाणे रोड, चितोड रोड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर जुने धुळे चार, कुमारनगर तीन, सुपडू आप्पा कॉलनी तीन, धरती कॉलनी तीन, दत्त मंदीर चार, स्नेहनगर चार, पवन नगर चार रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालय येथील अँटीजन टेस्ट अहवालात चार बाधीत आढळून आले आहेत. भीम नगर, सुभाष नगर, यशवंत नगर, धुळे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
खासगी लॅब येथील 33 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात भरत नगर, अजय नगर, फॉरेस्ट कॉलनी, अग्रवाल नगर, मोहाडी उपनगर, चितोड रोड, रासकर नगर, जयप्रकाश चौक, इंदिरा गार्डन, एकविरा शाळेजवळ, आग्रारोड, संभाप्पा कॉलनी, जमनागिरी रोड, गोकुळ नगर, मातोश्री चितोड रोड, आग्रा रोड, चाळीसगाव रोड, सातमाने, अग्रवाल पेट्रोल पंप शिंदखेडा, खलाणे, मंदाणे, कासारे, खर्दे, विरदेल रोड शिंदखेडा, विंचूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत जातोडे आणि मुकटी येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात थाळनेर दोन आणि आमोदे एक रुग्णाचा समावेश आहे. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील दत्त कॉलनीतील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात आंबोडे, अवधान, मोराणे, तुळशिराम नगर, साक्री रोड जय मल्हार कॉलनी, शिंदखेडा, बाभुळवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर सेवा हॉस्पीटल चार, धुळे दोन रुग्ण आढळले आहेत.