धुळे dhule । प्रतिनिधी
महापालिकेने (municipal corporation)शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूल (National Urdu High School)ते पूर्व हुडकोपर्यत डीपी (DP Road to East Hudko) रस्त्यावरील एकूण 96 अतिक्रमित घरे (Encroached houses) जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त (Landmate) केली. यावेळी काही नागरिकांनीही स्वेच्छेने अतिक्रमण काढून तसेच घरे खाली करुन महापालिकेला सहकार्य केले.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून शहरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाईत वाहतुकीस ठरणारे अतिक्रमण हटविले जात आहे. शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूल ते पूर्व हुडकोपर्यतच्या डीपी रस्त्यावर नागरिकांनी घरे बांधून अतिक्रमण केले होते. यासंदर्भात उच्च न्यायालयात सूनावणी झाली होती. त्यानुसार सन 2019 मध्ये न्यायालयाने अतिक्रमण हटविण्याचे आदेशही पारित केले होते. परंतु, हरकती व करोनाचा काळ यामुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई लांबणीवर पडत गेली.
.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने नॅशनल उर्दू हायस्कूल ते पूर्व हुडकोपर्यतच्या रस्त्यावरील घरांचे अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली. या कारवाईत जेसीबीच्या साहाय्याने तब्बल 96 अतिक्रमित घरे जमिनदोस्त केली.
या कारवाईसाठी मनपाचे अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव, सहायक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील यांच्यासह पथकातील कर्मचारी, चाळीसगावरोड पोलीस ठाणे व आझादनगरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यात एपीआय धीरज महाजन, आझादनगरचे एपीआय पावरा, पीएसआय विनोद पवार आदींचा समावेश होता. यावेळी नागरिकही स्वतःहून अतिक्रमण काढून घेत होते