घोटी | जाकीर शेख Ghoti
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: इगतपुरी तालुक्यातील २९ हजार हेक्टर वर असलेल्या भात शेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे चार तासात ९६ मिमी पाऊस झाला असून या महिन्यातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद आहे.
भात पिकासनाह फळबागांसह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. लांबलेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेल्या पिकाच्या भात लोंब्या सोंगणी नंतर गळण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अद्यापही पावसाचा अंदाज असल्याने शेतीच्या कामांचा उरक करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. मात्र अचानक आलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे.
यावर्षी शेतीला मान्सूनने चांगली साथ दिली. मात्र, ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्यात अवकाळी मान्सूनने मुक्काम ठोकला होता. त्यामुळे तयार झालेले भातपीक शेतात साचलेल्या पाण्यामुळे कापणे शक्य नव्हते. आता पावसाने परतीचा प्रवासाचे संकेत दिल्यानंतर कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, लोंब्यांच्या वजनामुळे भाताच्या काड्या मोडण्याचे व लोंब्या गळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यात शेतात पाणी च पाणी त्यामुळे भात सोंगणी करणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पावसाळ्यात मान्सूनने शेतकर्यांना दिलासा देणारी हजेरी लावली. मात्र, पीक तयार झाल्यानंतरही मान्सूनचा मुक्काम वाढल्याने अवकाळी पावसात तयार झालेले शेतातील भातपीक काही ठिकाणी आडवे झाले तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे कापणीला अडचणी निर्माण झाल्या.
इगतपुरी तालुक्यात भात शेतीचे मोठ्या प्रमनात पीक घेतले जाते मात्र गेल्या दोन दिवसापासून पाऊसाने अचानक हजेरी लावल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.. लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांनी सरसकट मदत द्यावी
– निर्मला गावीत- माजी आमदार
इगतपुरी तालुक्यात पूर्व भागात पाऊसाने झोड दिली. असून बळीराज मोठ्या संकटात सापडला आहे. भात पिकासाह द्राश शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाच्या वतीने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांनी सरसकट मदत द्यावी.
काशिनाथ मेंगाळ माजी आमदार
इगतपुरी तालुक्यात भात शेती हे एकमेव मुख्य पीक असून अवकाळी पाऊसाने भात शेतीची अक्षरशः वाट लावली आहे. त्याच बरोबर बागायती पिके देखील उध्वस्त केली असून कृषी विभागाने पंचनामे सुरु करावेत याबाबत लवकरच कृषीमंत्री यांना निवेदन देण्यातं येणार आहे
हिरामन खोसकर आमदार
या पावसामुळे बळीराजाची तारांबळ उडाली. भाताचा चांगला उतरा मिळणार या आशेवर असतानाच पावसाने तडाखा दिला. शेतकऱ्यांच्याहाताशी आलेले पीक वाया गेले आहे. शेतात भात पीक भिजून नुकसान झाले आहे. वातवरण असेच राहिले तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. अवकाळी पावसामुळे भात शेताकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळयांत पाणी येत आहे. त्यामुळे भात सोंगणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. हाती आलेले पीक पावसाने हिरावून घेतल्याने वर्षभर मेहनत करून भरघोस आलेले भाताचे पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती
पिकवावी की नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे. दुसरीकडे मजूर मिळत नसत अडचण वाढत आहे. प्रसंगी 500 रुपये देऊनही मजूर नाही.
ज्ञानेश्वर लहाने – माजी सभापती
हळे, इंद्रायणी, गरे, आर चोवीस, अक्षरा या भात वाणांसह नागली, वरई पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे त्यामुळे वाढती खते बी बियाणे, मजुरी हा सर्व खर्च वयाचा जाणार असल्याची चर्चा आहे.




