Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात ९९.०२ टक्के मतदान

विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात ९९.०२ टक्के मतदान

२२ जूनला होणार मतमोजणी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात एकूण ७ हजार ४७ मतदारांपैकी ६ हजार ९७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे राज्यभरात सरासरी ९९.०२ टक्के इतके मतदान नोंदविण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला होणार आहे.

- Advertisement -

भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ मे रोजी निवडणूक जाहीर केली होती. या १७ जागांमध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. सहा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, यवतमाळ, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आज ११ जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सर्वच्या सर्व म्हणजे ४५७ मतदारांनी मतदान केल्याने १०० टक्के मतदानाची नोंद झाली. तर अमरावती मतदारसंघात ४५१ पैकी ४२७ मतदारांनी मतदान करत ९४.६८ टक्के मतदान झाले, जे सर्वात कमी राहिले.

सांगली-सातारा मतदारसंघात ९९.८९ टक्के, सोलापूरमध्ये ९९.६८ टक्के, उस्मानाबाद-लातूर-बीडमध्ये ९९.४९ टक्के, नांदेडमध्ये ९९.७८ टक्के, नाशिकमध्ये ९९.८४ टक्के, परभणी-हिंगोलीमध्ये ९९.७९ टक्के, औरंगाबाद-जालनामध्ये ९८.९० टक्के, नागपूरमध्ये ९८.४४ टक्के, तर जळगावमध्ये ९७.७८ टक्के मतदानाची नोंद झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने आता सर्वांचे लक्ष मतमोजणी आणि निकालाकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : सप्तशृंगगड-नांदुरी घाट रस्ता तीन दिवस वाहतुकीसाठी बंद; कारण...

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | Sapthshurngi Gad साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर जाणारा रस्ता (Road) तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....