Friday, May 3, 2024
Homeराजकीयबोरकुंड गटातील विकासकामांचे खा.राऊतांनी केले कौतुक

बोरकुंड गटातील विकासकामांचे खा.राऊतांनी केले कौतुक

कापडणेे – Kapadne – प्रतिनिधी :

जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या अत्यल्प कालावधीत व कोवीड महामारीच्या गंभीर परिस्थितीतही बोरकुंड गटात विकासकामांचा डोंगर उभा राहिला आहे. सततचा पाठपुरावा व वरिष्ठाकडे वेळोवेळी व्यवस्थितरित्या केलेली मांडणी.

- Advertisement -

यामुळे एका जि.प.गटात लक्षावधीची कामे होणे होणे शक्य झाले आहे. बोरकुंड गटाचा सर्वांगीण विकास कौतुकास्पद असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खा.संजय राऊत यांनी सांगितले.

बोरकुंड जि.प.गटातील कामांचे कौतुक करतांनाच, भविष्यातही विकास कामांसाठी सर्वंकष सहकार्य राहिल असे आश्वस्त केले.

याप्रसंगी खा.संजय राऊत, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, आ. मंजुळाताई गावित, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, महानगरप्रमुख मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, गुलाब माळी, देवेंद्र माळी यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बाळासाहेब भदाणे व माजी जि.प.सदस्या शालिनीताई भदाणे यांच्या हस्ते, ग्रामीण भागाचे व शेतकर्‍यांचे प्रतिक असलेली बैलगाडी भेट देऊन खा.राऊत यांचा सन्मान करण्यात आला. तसेच बोरकुंड जि.प.गटातील विकास कामांच्या पुस्तिकेचे खा.संजय राऊत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

बोरकुंड जि.प.सदस्य पदाच्या अल्प काळातच शासनाच्या विविध योजनांतुन बोरकुंड गटातील अनेकविध कामे मार्गी लागली, यात जिल्हा परिषद, लघुसिंचन, विद्युत वितरण कंपनी, कृषी विभाग, बांधकाम विभाग, आदी विभागात पाठपुरावा करुन जिल्हा स्तरावरुन व राज्य शासन स्तरावरुन भरघोस निधीसह मंजूरी मिळविली.

आजपर्यंत बोरकुंड गटासाठी तब्बल 1860 लक्ष रुपयाचा भरघोस निधी खेचुन आणत, गटाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत आगामी काळात पुढील मार्गक्रमण चालुच राहिल असा आशावाद यावेळी बाळासाहेब भदाणे व शालिनीताई भदाणे यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या