Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशतुमचे आरोग्य आणि तुमच्या कल्याणाची सूत्रे आता तुमच्या हाती घ्या

तुमचे आरोग्य आणि तुमच्या कल्याणाची सूत्रे आता तुमच्या हाती घ्या

मुंबई | Mumbai

यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन “पूर्वीच्या योग दिनांपेक्षा अधिक महत्त्वपूर्णआहे ” असे वर्णन करताना ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी कमीतकमी संघर्षाने जीवनाच्या कठोरतेतून पार पडण्यासाठी शारीररक आणि मानसिक लवचिकता बळकट करण्यावर भर दिला.

- Advertisement -

ईशाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात सद्गुरु म्हणाले, “एक चैतन्यशील आणि लवचिक शरीर निर्माण करणे, एक आनंदी आणि एकाग्र मन आणि तुमच्या आत निरंतर वाहणारी ऊर्जा; आजच्या या बाह्य हल्ल्याचा सामना करण्यासाठी अधिक गरजेचे आहे, जे आज वैज्ञानिक म्हणत आहेत की हा विषाणू हल्ला पुन्हा पुन्हा होऊ शकतो.”

ईशाने तीन योग सरावाचा एक व्हिडिओ ऑनलाईनच्या माध्यमातून प्रकाशित केला आहे; जो रोगप्रदतकार शक्ती मजबूत करू शकतो, फुफ्फुसांची क्षमता वाढवू शकतो आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी उंचावू शकतो. या निशुल्क व्हिडिओमध्ये सामील आहे साष्टांग, मकरासन आणि सिंहक्रिया सराव.

“या ग्रहावरील प्रत्येक मनुष्याने याचा उपयोग करावा” आणि आरोग्य आणि डॉक्टरांवर अवलंबून न राहता स्वतःच त्यांनी त्यांचे आरोग्य आणि कल्याणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. “आरोग्य हे काही आपल्याला डॉक्टर किंवा वैद्यकीय सेवा देणाऱ्याकंडून लाभत. ते आपल्या आतूनच यायला हवे,” असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या