Saturday, May 4, 2024
Homeनाशिकशहरात विविध ठिकाणी दोघांच्या आत्महत्या

शहरात विविध ठिकाणी दोघांच्या आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | नाशिक

शहरात विविध ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एकाने विषारी औषध सेवन करून तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे…

- Advertisement -

राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना सावतानगर परिसरात घडली. भूषण विजय बडगुजर (३४, रा. सावतानगर, नवीन नाशिक) असे आत्महत्या करणार्‍याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपासणी यांनी राहत्या घरातील हॉलमधील फॅनच्या रॉडला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना भद्रकालीतील काझीघडी परिसरातील दत्तमंदिर जवळ घडली. येथे राहणारे विशाल शंभु उत्तरडे (४५) यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या