Saturday, May 4, 2024
Homeक्रीडासलग दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव

सलग दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव

कार्डिफ | Cardiff

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा पराभव केला. ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत इंग्लंडने २-० अशी विजयी आघाडी घेऊन टी २० मालिकाही आपल्या खिशात टाकली आहे. अखेरचा टी २० सामना २६ जूनला साउथम्पटन येथे खेळविण्यात येणार आहे…

- Advertisement -

श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १११ धावा काढल्या. धावफलकावर १८ धावा झालेल्या असताना श्रीलंकेने धनुष्का गुणतिलका, आणि अविष्का फर्नांडो या दोन्ही सलामीवीरांना अगदी स्वस्तात गमावले.

त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या कर्णधार कुशल परेरा आणि कुशल मेंडिस यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचून आपल्या संघाचा डाव पुन्हा एकदा रुळावर आणला. कुशल परेरा आणि कुशल मेंडिस बाद झाल्यावर श्रीलंकेचा डाव पुन्हा एकदा कोसळला.

इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि फिरकी गोलंदाज आदिल रशीद यांनी प्रत्येकी २-२ गडी टिपले. पावसाच्या व्यत्ययाने इंग्लंडला १८ षटकात १०३ धावांचे लक्ष देण्यात आले होते. धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाची सुरुवातही अतिशय अडखळती झाली.

सलामीवीर जॉनी बेरस्टो भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या डेविड मलानदेखील केवळ ४ धावा काढून माघारी परतला. तर कर्णधार ऑईन मॉर्गन केवळ ११ धावा काढून बाद झाला.

यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या लियम लिंगविस्टन, सॅम करण आणि सॅम बिलिंग्ज यांनी मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून दिला. सॅम बिलिंग्ज २४, लिंगविस्टन २९ तर सॅम करण याने १६ धावांचे योगदान दिले.

श्रीलंकेकडून दुष्मंता चमीरा, फर्नांडो आणि इसरु उदाना यांनी प्रत्येकी १-१ तर वानिंदु हसरंगा याने २ गडी टिपले. लियम लिंगविस्टन याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या