Friday, May 3, 2024
Homeराजकीयपेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी

पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

केंद्र सरकारने पेगॅसस स्पायवेअरच्या (Pegasus Spyware ) प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश अद्याप दिले नाहीत. माते, पश्चिम बंगालच्या सरकारने या हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून पेगॅससची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole ) यांनी मंगळवारी केली.

- Advertisement -

पेगॅससच्या माध्यमातून महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्याचे काम २०१७ सालापासून होत असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही माझ्यासह इतर विविध पक्षातील राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते. हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित केला होता, त्याची चौकशी होत आहे.

परंतु विषयाचे गांभार्य पाहता फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग आणि पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून केलेली हेरगिरी यांचा काही संबंध आहे का? या सॉफ्टवेअरचा राज्यात वापर केला आहे का? केला असेल तर ते कुणाकडून? असे अनेक पश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही सेवानिवृत्त न्यायाधिशांची चौकशी समिती नेमली तर सत्य बाहेर येईल, असे पटोले म्हणाले.

महाराष्ट्रातील आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर(Use of phone tapping ) केल्याची चर्चा मध्यंतरी होती. विरोधी पक्षांच्या आमदारांना धमकावण्याचे प्रकारही काही अधिकाऱ्यांच्यामार्फत केले गेल्याची चर्चा होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. न्यायालयीन चौकशीतून अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळतील. या प्रकरणात कोण सहभागी होते याचाही पर्दाफाश होईल, असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या