Saturday, May 4, 2024
Homeनगर‘तू वाळूचोर’ ‘तू पिपल्स बँक खाल्ली !’

‘तू वाळूचोर’ ‘तू पिपल्स बँक खाल्ली !’

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पालिका निवडणूक (Shrirampur Municipal elections) तोंडावर आल्याने नगरपालिकेतील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. काल दुपारी याची चुणूक श्रीरामपूरकरांना (Shrirampur) अनुभवयास मिळाली. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांच्यात पालिकेच्या प्रवेशद्वारावर झालेली शाब्दीक चकमक थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहचली. त्यात एकाने ‘तू वाळूचोर‘ आहे असा आरोप करताच दुसर्‍याने ‘तू पिपल्स बँक खाल्ली’ असा प्रतिवार केल्याने आगामी पालिका निवडणूक चांगलीच गाजणार याचे हे संकेत मानले जात आहे. दरम्यान याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) परस्पर विरोधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

- Advertisement -

काल काँग्रेसच्यावतीने (Congress) आशा सेविकांच्या मानधनप्रश्नी मुख्याधिकार्‍यांना घेराव घालण्यात येणार होता. त्यासाठी माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे हे नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आपल्या सहकार्‍यांची वाट पहात होते. त्याचवेळी सत्ताधारी नगरसेवक रवी पाटील हे पालिकेतून आपले काम आटोपून बाहेर आले. दोघांची नजरानजर झाली. त्यावेळी नगरसेवक रवी पाटील यांनी काय पाहतोस? असे डिवचले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. नगरसेवक रवी पाटील यांना उद्देशून ‘तू तर वाळूचोर आहे’, असे माजी नगराध्यक्ष कांबळे म्हणाले.

त्याला नगरसेवक रवी पाटील यांनी तू पिपल्स बँक खाल्ली? असा प्रतिहल्ला केला. एवढ्यावर हा वाद थांबला नाही तर मागील पालिका निवडणुकीत तू आमच्यामुळेच निवडून आला असा आरोप दोघांनीही एकमेकांविरुध्द केला. ही बाचाबाची पहाण्यासाठी नगरपालिकेसमोर नागरिकांनी एकच गर्दी केली. काहींनी आवरण्याचा प्रयत्नही केला. मात्र दोघांनीही एकमेकांवर तोंडसुख घेतले.

माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे व नगरसेविका भारती कांबळे यांनी शहार पोलीस ठाणे गाठत हा वाद पोलीस ठाण्यात नेवून पोहोचवला. नगरसेवक रवी पाटील यांच्या विरोधात विरुध्द तक्रार दाखल केली. तक्रारीत असे म्हटले आहे की, कॅनॉलच्या कडेला बांधलेल्या गाळ्यात गैरव्यवहार झाला असून आम्ही त्या व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या गाळेधारकांना गाळे देताना दुजाभाव केला. व्यावसायिकांना गाळ्यांचे वाटप व्यवस्थित केले नाही. पुढचे गाळे देतांना अन्याय केला. या अन्यायाच्या विरोधात आम्ही उभे राहिलो म्हणून तो राग मनात धरुन नगरसेवक रवी पाटील यांनी शिवीगाळ करून धमकी दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक रवी रमेश पाटील यांचेविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

भागात परस्पर कामे करून तू राजकारण करतोस. तुला जादा झालेय. तुला बघतो. तू किती …हे आम्हाला माहिती आहे. तू वाळूचा धंदा धरतो असे म्हणून अनिल कांबळे यांनी शिवीगाळ केली, अशी तक्रार नगरसेवक रवी पाटील यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी अनिल शामराव कांबळे यांचेविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या